अटारी बॉर्डरवर सर्वांत उंच राष्ट्रध्वज, पाकिस्तानचा हेरगिरीचा कांगावा

By admin | Published: March 6, 2017 10:43 AM2017-03-06T10:43:30+5:302017-03-06T10:43:30+5:30

अटारी आंतरराष्ट्रीय बॉर्डरवर रविवारी तब्बल 360 फूट उंचींचा राष्ट्रध्वज उभारण्यात आला. हा ध्वज देशातील सर्वांत उंच ध्वज असल्याचे मानले जात आहे.

The largest national flag at the Attari border, the Kangwa of Pakistan's espionage | अटारी बॉर्डरवर सर्वांत उंच राष्ट्रध्वज, पाकिस्तानचा हेरगिरीचा कांगावा

अटारी बॉर्डरवर सर्वांत उंच राष्ट्रध्वज, पाकिस्तानचा हेरगिरीचा कांगावा

Next

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 6 - अटारी आंतरराष्ट्रीय बॉर्डरवर रविवारी तब्बल 360 फूट उंचींचा राष्ट्रध्वज उभारण्यात आला. हा ध्वज देशातील सर्वांत उंच ध्वज असल्याचे मानले जात आहे. हा तिरंगा 120 फूट लांब आणि 80 फूट रुंद एवढा मोठ्या आकाराचा आहे. या ध्वज बनवण्यासाठी जवळपास 3.50 कोटी रुपये इतका खर्च आला आहे. अमृतसर सुधार प्रन्यास प्राधिकरणाचा हा प्रकल्प आहे.  देशातील सर्वात उंच तिरंग्याचे पंजाबचे मंत्री अनिल जोशी यांनी ध्वजारोहण केले. यापूर्वी झारखंडमधील रांची येथी 293 फूट उंच तिरंगा फडकवण्यात आला होता. 

हेरगिरीसाठी ध्वज लावल्याचा पाकिस्तानचा आरोप
दरम्यान, या आंतरराष्ट्रीय सीमेवर तिरंगा फडकवण्यावर पाकिस्तानने आक्षेप नोंदवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी रेंजर्सने बीएसएफकडे असंतोष व्यक्त करत सीमेपासून दूर ध्वज उभारण्याची मागणी केली आहे. या ध्वज उभारणीमुळे आंतरराष्ट्रीय कराराचे उल्लंघन होत असल्याचा कांगवाही पाकिस्तानने केला आहे. 'भारत या उंच तिरंग्याचा हेरगिरीसाठी वापर करू शकतो', असा संशयदेखील पाकिस्तानातील अधिका-यांनी व्यक्त केला आहे. 
 
कोणतेही उल्लंघन झालेले नाही : भारत 
दरम्यान, पाकिस्तानच्या या संशयावर भारताने आपले स्पष्टीकरण देत सांगितले की, सीमेपासून 200 मीटर अंतरावर हा ध्वज उभारण्यात आला आहे यामुळे कोणत्याही प्रकारचे उल्लंघन झालेले नाही. 
तर 'आमच्या धरतीवर आमचा राष्ट्रीय ध्वज फडकवण्यापासून आम्हाला कुणीही थांबवू शकत नाही', असे खडेबोल मंत्री अनिल जोशी यांनीही पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. 
 

Web Title: The largest national flag at the Attari border, the Kangwa of Pakistan's espionage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.