सर्वात मोठी ऑफिस बिल्डिंग भारतात; रत्न राजधानीत उभारणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 07:36 AM2023-07-20T07:36:55+5:302023-07-20T07:38:07+5:30
सुरतेला जगाची रत्न राजधानी म्हणून ओळखले जाते. जगातील ९० टक्के हिऱ्यांना येथे पैलू पाडले जातात
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठे कार्यालय संकुल म्हणून अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय ‘पेंटॅगॉन’कडे पाहिले जात होते. पेंटॅगॉनचा हा किताब गुजरातमधील सुरत डायमंड एक्स्चेंजने हिसकावून घेतला आहे. ४ वर्षांत तयार झालेली सुरत डायमंड एक्स्चेंजची १५ मजली इमारत जगातील सर्वांत मोठे कार्यालय संकुल ठरली आहे.
सुरतेला जगाची रत्न राजधानी म्हणून ओळखले जाते. जगातील ९० टक्के हिऱ्यांना येथे पैलू पाडले जातात. येथे ६५ हजार हिरे व्यावसायिक काम करू शकतील.
‘सुरत डायमंड बोर्स’ : ही १५ मजली इमारत ३५ एकरवर पसरलेली आहे. या संकुलात एकूण ९ आयातकार इमारती आहेत. यात ७.१ दशलक्ष चौरस फूट चटई क्षेत्र उपलब्ध आहे. इमारतीत १३१ एलिव्हेटर्स, १ मनोरंजन क्षेत्र आणि २० लाख चौ. फुट पार्किंग क्षेत्र आहे.