जगातलं सगळ्यात मोठ्ठं कुराण बडोद्यातल्या मशिदीत?

By admin | Published: May 23, 2016 04:25 PM2016-05-23T16:25:05+5:302016-05-23T16:25:05+5:30

जगातलं सगळ्यात मोठं कुराण बडोद्यातल्या जामा मशिदीमध्ये असल्याचं समोर आलं आहे. ही मशिद इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांच्यामुळे भारतामध्ये प्रसिद्ध झालेली आहे

The largest Quran in the mosque in Baroda? | जगातलं सगळ्यात मोठ्ठं कुराण बडोद्यातल्या मशिदीत?

जगातलं सगळ्यात मोठ्ठं कुराण बडोद्यातल्या मशिदीत?

Next
>ऑनलाइन लोकमत
बडोदा, दि. 23 - जगातलं सगळ्यात मोठं कुराण बडोद्यातल्या जामा मशिदीमध्ये असल्याचं समोर आलं आहे. ही मशिद इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांच्यामुळे भारतामध्ये प्रसिद्ध झालेली आहे. मात्र, ही नवीन माहिती या मशिदीसाठी नवीन मानाचा तुरा ठरेल अशी चिन्हे आहेत.
 
 
या मशिदीतल्या कुराणाची लांबी 75 इंच व रुंदी 41 इंच आहे. एकाचवेळी अनेक जण या कुराणाभोवती बसून त्यातल्या आयती वाचू शकतात. मोरपिसाने दौतीच्या सहाय्याने हे कुराण लिहिण्यात आलं असून त्याच्या पानांच्या चौकटींना सोनेरी झालर आहे.
सध्या तरी गिनिज बुकमध्ये जगातलं सगळ्यात मोठं कुराण म्हणून रशियातल्या कझानमधल्या मशिदीतल्या कुराणाची नोंद आहे. या कुराणाची लांबी 59 इंच तर रुंदी 79 इंच आहे.
 

Web Title: The largest Quran in the mosque in Baroda?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.