"आता इशारा नाही, अॅक्शन घेऊ!", काश्मीरमध्ये हल्ला करण्यावरून दोन दहशतवादी संघटनांमध्ये जुंपली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 00:57 IST2020-04-26T23:13:10+5:302020-04-27T00:57:30+5:30
गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल मुजाहिदीन सोडल्यानंतर अब्बास शेख पूर्णपणे अंडरग्राउंड झाला आहे. टीआरएफमध्ये सहभागी झाल्यानंतर तो हिजबुल आणि संरक्षण दलापासून लपत फिरत आहे.

"आता इशारा नाही, अॅक्शन घेऊ!", काश्मीरमध्ये हल्ला करण्यावरून दोन दहशतवादी संघटनांमध्ये जुंपली
श्रीनगर : भारतावर भ्याड हल्ले करणाऱ्या दहशतवादी संघटनांची आता आपसातच जुंपली आहे. काश्मीर खोऱ्यात सक्रिय असलेल्या लश्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन सध्या आपसात भिडण्याच्या तयारीत आहेत. लश्कर-ए-तैयबाने 'द रेजिस्टंस फ्रंट' (टीआरएफ) नावाने एक नवी संघटना तयार केली आहे. यानंतर हिजबुल मुजाहिदीनचा टॉप कमांडर असलेल्या अब्बास शेखने हिजबुलची साथ सोडून, टीआरएफचा हात पकडला. यामुळे टीआएफ आणि लश्कर आता हिजबुलच्या निशाण्यावर आहे.
यासंदर्भात तहरीक-ए-पीपल्स पार्टीने शुक्रवारी हाताने लिहिलेले एक पोस्टर जारी केले आहे. यात, त्यांचा ऑपरेशनल कमांडर अब्बास शेखने हिजबुलची साथ सोडली असल्याचे लिहिले आहे. तसेच अब्बासचा, कश्मिरी पोलीस आणि सामान्य नागरिकांना मारण्यास विरोध होता, असेही यात म्हणण्यात आले आहे.
खूशखबर...कोरोनावरील लसीची चाचणी करण्यात आलेली महिला म्हणाली, 'Doing Fine'!
अब्बास 'अंडरग्राउंड' -
गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल मुजाहिदीन सोडल्यानंतर अब्बास शेख पूर्णपणे अंडरग्राउंड झाला आहे. टीआरएफमध्ये सहभागी झाल्यानंतर तो हिजबुल आणि संरक्षण दलापासून लपत फिरत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्बास दावा करतो की, 12 सक्रिय सदस्य आणि अनेक स्थानिक लोक त्याच्या सोबत आहेत.
आता इशारा नाही, अॅक्शन घेऊ -
टीआरएफनेही, इस्लामिक जिहादी लोकहो आणि 'रेजिस्टंट टिल व्हिक्ट्री' या पंचलाइनने एक पत्र जारी केले आहे. यात, 'काही दिवसांपूर्वीच आम्ही हिजबुल मुजाहिदीनला इशारा दिला होता, की त्यांनी काश्मीरमधील पोलीस कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना मारणे बंद करावे. मात्र, त्यांनी शोपियांमधून जम्मू-काश्मीरच्या एका पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण केले. हिजबुल मुजाहिदीनला समजायला हवे, की आपली लढाई भारतीय संरक्षण दलाशी आहे. कश्मिरी लोकांशी नाही. आश्मिरी लोक आपलेच आहेत. आपण त्यांच्या सहकार्याशिवाय संरक्षण दलाशी लढू शकत नाही. आम्ही विचार केला होता, कीआपण एकत्रितपणे लढू मात्र ही आमची मोठी चूक होती,' असे टीआरएफने म्हटले आहे.
अलर्ट! 300 दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत, लष्कराला देण्यात आलाये 'असा' आदेश
तसेच जे काश्मीरमधील लोकांना त्रास देतील त्यांच्याशी आम्ही लढू. हिजबुलला हा अखेरचा इशारा आहे. आम्हाला मजबूर करू नका. यानंतर कुठल्याही प्रकारचा इशारा नाही. केवळ अॅक्शन घेतली जाईल, असेही टीआरएफने म्हटले आहे.