लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा
By admin | Published: January 24, 2017 02:19 PM2017-01-24T14:19:56+5:302017-01-24T14:19:56+5:30
मारले गेलेल्या दोन दहशतवाद्यांकडून 2 एके-47 जप्त करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
जम्मू कश्मीर, दि. 24 - जम्मू कश्मीर मदील गांदरबल येथे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत भारतीय जवानांनी 2 दहशतवाद्यां कंठस्नान घातले आहे. चकमक सुरू असतानाच बाजूचा परिसर रिकामा करण्यात आला होता. मारण्यात आलेले दहशतवादी हे लष्कर-ए-तोयबा संघटनेचे असल्याचे समजते. सकालीपासूनच दहशतवादी आणि जवांनामध्ये चकमक सुरु झाली होती. दहशतावाद्यांचा खात्मा केल्यानंतर भारतीय जवानांनी परीसरात सर्च ऑपरेशन केले.
मारले गेलेल्या दोन दहशतवाद्यांकडून 2 एके-47 जप्त करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.