लष्कर-ए-तयब्बाच्या दहशतवाद्याचा लष्कराकडून खात्मा
By admin | Published: January 6, 2017 08:47 AM2017-01-06T08:47:21+5:302017-01-06T08:49:36+5:30
जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात सुरक्षा जवानांनी दहशतवादी मुझफ्फर अहमदला ठार केलं आहे
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 6 - जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात सुरक्षा जवानांनी दहशतवादी मुझफ्फर अहमदला ठार केलं आहे. मुझफ्फर अहमदचे लष्कर-ए-तयब्बाशी संबंध होते. शुक्रवारी सकाळी पोलीस आणि लष्करासोबत झालेल्या चकमकीत तो ठार झाला आहे. मुझफ्फर अहमदला अनेक प्रकरणांमध्ये वॉण्टेड होता. मुझफ्फर अहमदला सधअया अल-बदर या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होता. याआधी तो लष्कर-ए-तयब्बामध्ये सामील होता. चकमकीदरम्यान एक पोलीस जखमी झाला आहे.
दरम्यान दुसरीकडे नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार शौकत गनी यांच्या घराबाहेर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. जम्मू काश्मीरमधीलच शोपिअन जिल्ह्यात हा गोळीबार झाला. दहशतवाद्यांनी रात्रीच्या वेळा हा गोळीबार केला. प्रत्युत्तरात सुरक्षारक्षकांकडून गोळीबार करण्यात आला. सुदैवाने दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा आमदार शौकत गनी घरात नव्हते. हल्ल्यात कोणीही जखमी झालेलं नाही.
#FLASH: Al-Badr terrorist Muzzafar Ahmed killed in encounter with Army &Police in Machu area of district Budgam (J&K) in early morning hours
— ANI (@ANI_news) 6 January 2017
Incident happened in the night, no casualties. National conference MLC Showkat Ganie wasn't present at his Shopian residence during incident
— ANI (@ANI_news) 6 January 2017