पुलवामात लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

By admin | Published: June 22, 2017 06:35 AM2017-06-22T06:35:03+5:302017-06-22T06:46:20+5:30

भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांच्या झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यां कंठस्नान घातले आहे.

Lashkar-e-Toiba terrorists killed in Pulwama | पुलवामात लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

पुलवामात लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

Next

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 22 - जम्मू काश्मीरमध्ये दक्षिणेकडील पुलवामा जिल्हय़ात भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांच्या झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यां कंठस्नान घातले आहे. मारले गेलेल्या दहशतवाद्यांकडून 3 एके-47 जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे मोठ्याप्रमाणात दारुगोळाही जप्त करण्यात आला आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, पाकव्याप्त काश्मीरमधून दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसले होते. भारतीय जवान गस्तीवर गेले असता त्यांनी दहशतवाद्यांच्या हलचाली दिसल्या. त्याचदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. या गोळीबाराला भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिलं. या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे तीन दहशतवादी ठार झाले. ही चकमक पुलवामा जिल्ह्यातील काकापोरा स्थित न्यू कालोनी भागात झाली. यादरम्यान भारतीय लष्कराचा एक एक जवान गंभीर झाला आहे.

Web Title: Lashkar-e-Toiba terrorists killed in Pulwama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.