उरी हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबाच

By admin | Published: October 26, 2016 01:19 AM2016-10-26T01:19:21+5:302016-10-26T01:19:21+5:30

उरी येथे भारतीय लष्कराच्या तळावर झालेल्या हल्ल्यामागे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना असल्याचे स्पष्ट झाले आहे. उरी येथे ज्या दहशतवाद्यांनी हल्ला

Lashkar-e-Toibaatch on Uri's attack | उरी हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबाच

उरी हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबाच

Next

गुजरनवाला : उरी येथे भारतीय लष्कराच्या तळावर झालेल्या हल्ल्यामागे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना असल्याचे स्पष्ट झाले आहे. उरी येथे ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यातील एका दहशतवाद्यासाठी लष्कर-ए-तोयबाने विशेष नमाज पठण करण्याचे ठरवले आहे. तशी पोस्टर्स पाकिस्तानातील गुजरनवाला भागात लावण्यात आली आहेत.
हीे पोस्टर्स म्हणजे उरी दहशतवादी हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचा हात असल्याचा स्पष्ट पुरावा आहे. पाकिस्तान आतापर्यंत उरी हल्ल्याशी आपला संबंध नसल्याचे सांगत आला आहे. त्याबाबतचे सर्व आरोप पाकने फेटाळले आहेत. उरीवर हल्ला करणाऱ्या एकाचे नाव मोहम्मद अनस उर्फ अबू सिराका असे आहे. तो गुजरनवालाचा रहिवासी होता.
लष्कर-ए-तोयबाच्या या दहशतवाद्यासाठी विशेष नमाज पठणाचे आयोजन करण्यात येणार असून, त्यात स्थानिक रहिवाशांना सहभागी होण्याचे आवाहन पोस्टर्समार्फत करण्यात आले आहे. अबू सिराकाने १७७ हिंदू सैनिकांचा खात्मा केला, असा खोटा प्रचार या पोस्टर्समधून करण्यात येत आहे. लष्कर-ए-तोएबाचा प्रमुख हाफीझ सईदचे छायाचित्रही पोस्टर्सवर झळकत आहेत. (वृत्तसंस्था)

दहशतवादाची कर्मभूमी
दहशतवादाच्या मुद्द्यावरून भारताने पाकला फटकारले आहे. जीनिव्हात झालेल्या आंतरराष्ट्रीय संसदीय संघटनेच्या बैठकीत भारताने सोमवारी पाकिस्तानच्या नावाचा थेट उल्लेख करून, तो देशच दहशतवादीची कर्मभूमी बनल्याचा टोला लगावला.
बैठकीत पाकने काश्मीरचा प्रश्न उपस्थित करताच, भारताने चोख प्रत्युत्तर दिले. दहशतवादामुळे मानवाधिकारांचे उल्लंघन होत आहे आणि पाकिस्तान अशा दहशतवादासाठी कर्मभूमी आहे, असे टीकास्त्र भारताने सोडले.
गोव्यातील ब्रिक्स परिषदेतही भारताने पाकचा दहशतवादाची जननी असा उल्लेख केला होता.
या परिषदेत पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांनी केलेल्या ठरावाचा हवाला देत काश्मीर प्रश्न उपस्थित केला. त्यावर पाकिस्तानने या ठरावातील उल्लेखानुसार सर्वात आधी पाकव्याप्त काश्मीरवरील ताबा सोडावा, अशी मागणी भारताने केली.

Web Title: Lashkar-e-Toibaatch on Uri's attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.