Corona Wave in India: देशात चोवीस तासांत तब्बल ३४ हजार जणांना काेराेनाची बाधा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 06:45 AM2022-01-04T06:45:16+5:302022-01-04T06:45:28+5:30
केंद्रीय कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक यंत्रणेद्वारे नोंदविली जाणारी हजेरी ३१ जानेवारीपर्यंत स्थगित केली आहे.
नवी दिल्ली : ओमायक्रॉन विषाणूच्या बाधितांची संख्या आता १७०० वर पोहोचली असून, त्यातील ६३९ जण बरे झाले. या विषाणूचे महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असून, त्यानंतर दिल्ली, केरळ, गुजरात, तमिळनाडू, राजस्थान यांचा क्रमांक लागतो. गेल्या चोवीस तासात देशामध्ये कोरोनाचे ३३,७५० रुग्ण आढळले असून, सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख ४५ हजार ५८२ वर पोहोचली आहेे, तसेच १२३ जण मरण पावले.
हजेरी ३१ जानेवारीपर्यंत स्थगित
केंद्रीय कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक यंत्रणेद्वारे नोंदविली जाणारी हजेरी ३१ जानेवारीपर्यंत स्थगित केली आहे. कार्यालयात बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी लागत असताना संसर्गाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. गर्भवती महिलांना कार्यालयात येण्याचे बंधन नाही तसेच केवळ ५० टक्के कर्मचारी काम करतील.
अमेरिकेत पाच दिवसांचे विलगीकरण
n अमेरिकेमध्ये ओमायक्रॉनची लक्षणे आढळून आली नाहीत, त्यांचे विलगीकरण पाच दिवसांपर्यंत कमी करण्यात आले.
n अशा रुग्णांची कोरोना चाचणी निगेटिव्ह येईपर्यंत विलगीकरण कायम राहील हे बंधन काढून टाकण्यात आले आहे.
n हा निर्णय सेंटर फॉर डिसिजेस कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेने केलेल्या शिफारसीनुसार अमेरिकेच्या सरकारने घेतला आहे. विलगीकरणाचा पाच दिवसांचा कालावधी संपल्यानंतर पुढचे पाच दिवस मास्क घालून वावरणे बंधनकारक आहे.केंद्रीय कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक