मागील ४६ वर्षात देशभरात १ हजार पटीने महिला अत्याचारात वाढ; धक्कादायक आकडेवारी उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 12:13 PM2019-12-09T12:13:02+5:302019-12-09T12:13:52+5:30
देश स्वातंत्र्य झाल्यापासून महिलांवरील अत्याचार आणि बलात्कार या गुन्ह्यात वाढ होताना दिसत आहे.
नवी दिल्ली - देशभरात बलात्काराच्या घटनांची संपूर्ण देशाला हदरवून टाकलं आहे. हैदराबाद, उन्नाव, दिल्ली निर्भया प्रकरणानंतर लोकांनी आक्रोश व्यक्त केला. मात्र गेल्या ४६ वर्षात देशात बलात्काराच्या घटनांमध्ये १ हजार पटीने वाढ झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. नॅशनल क्राईम रिकोर्ड ब्युरोने ही माहिती दिली आहे.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार १९७१ ते २०१७ या ४६ वर्षात बलात्काराच्या गुन्ह्यात १, ३५३ पटीने वाढ झालेली आहे. या तुलनेत लोकसंख्या वाढीत २२० टक्के वाढ झालेली दिसते. हैदराबाद घटनेत पीडित तरुणीवर झालेल्या बलात्कारानंतर ४ आरोपींना पोलिसांनी अटक केली. या चारही आरोपींचा एन्काऊंटर पोलिसांनी केला. याबाबत लोकांकडून कौतुक होत असलं तरी अनेकांनी या प्रश्न उपस्थित केले आहेत. या एन्काऊंटरनंतर देशात न्यायव्यवस्थेवरुन वादंग निर्माण झालेत.
एन्काऊंटर करणे चुकीचं आहे की बरोबर हे हैदराबाद पोलिसांना माहिती असेल. एन्काऊंटरनंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीबाबत पोलिसांना जाण होती. प्रकरणाची चौकशी होणार याचीही माहिती होती. तरीही आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करताना त्यांचा एन्काऊंटर करण्यात आला. देश स्वातंत्र्य झाल्यापासून महिलांवरील अत्याचार आणि बलात्कार या गुन्ह्यात वाढ होताना दिसत आहे. इतकचं नाही तर महिला अत्याचारातील आरोप असणारे अनेक जण संसदेत आणि विधानसभेत पोहचले. १९७१ मध्ये देशभरात २ हजार ४८७ बलात्काराचे गुन्हे नोंद होते. २०१७ मध्ये हा आकडा ३३ हजार ६५८ पर्यंत पोहचला. हे आकडे कागदोपत्री आहेत. याशिवाय अशी अनेक प्रकरणं दाबली गेली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. एनसीआरबी गुन्ह्याचे रेकॉर्ड १९५३ पासून ठेवत आहे. १९७१ मध्ये महिलांवर अत्याचाराचे गुन्हे रेकॉर्ड होऊ लागले. १९७१ ते २०१३ पर्यंत महिलांवरील अत्याचाराची नोंद एनसीआरबीकडे ठेवली जात होती. मात्र २०१४ पासून याची तुलनात्मक आकडेवारी समोर आली नाही.
१९९० पासून महिला आपल्या अधिकारांसाठी पुढे येऊ लागल्या. महिलांवरील अत्याचारात कमी होताना दिसत नाही. एनसीआरबीने दिलेल्या आकडेवारीमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा आणखी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. २००६ मध्ये महिलांवरील अत्याचारात १९७१ च्या तुलनेत ७७७ टक्के वाढ झाली होती. १९७१ मध्ये ही संख्या २ हजार ७८४ होती तर २००६ मध्ये १९ हजार ३४८ महिला अत्याचारांच्या गुन्ह्याची नोंद होती. एनसीआरबी अहवालानुसार २०१४ मध्ये ३६ हजार ९६८ महिलांवरील अत्याचारांची नोंद आहे. तसेच २०१७ च्या आकडेवारीनुसार देशातील १ हजार ३७१ जेलमधील ५० हजार ६६९ आरोपींवर महिला अत्याचार गुन्ह्याची नोंद आहे.