८ महिन्यांत केवळ चार बैठका जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांकडून ना मदत, ना संवाद हरी मोकाशे, लातूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी, चारा, रोजगार
By admin | Published: September 16, 2015 11:37 PM2015-09-16T23:37:31+5:302015-09-17T00:30:46+5:30
लातूर शहर व परिसरातील काही गावे वगळता तालुक्यातील काही गावांचा समावेश लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आहे़ त्यामुळे आमदारांची संख्या दोन आहे़ तालुक्यात जिल्हा परिषद सदस्यांची संख्या ९ आहे तर पंचायत समिती सदस्यांची संख्या १८ आहे़ लातूर महानगरपालिकेतील सदस्यांची संख्या ७५ अशी आहे़ सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, नागरिक, मजूर हे चारा, पाणी, रोजगार अशा विविध समस्यांमध्ये अडकले आहेत़ त्यामुळे नागरिकांच्या किमान पाणी, चारा, रोजगार अशा समस्या तरी सुटाव्यात म्हणून लातूर शहरचे आमदार अमित देशमुख यांनी जानेवारी ते आजपर्यंत चार बैठका घेतल्या आहेत़ या बैठकांमध्ये प्रशासकीय अधिकार्यांना टंचाई निवारणासंदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना केल्या आहेत़ तसेच पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून नागझरी, साई, महापूर, कातपूर, साखरा, रेण
लातूर शहर व परिसरातील काही गावे वगळता तालुक्यातील काही गावांचा समावेश लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आहे़ त्यामुळे आमदारांची संख्या दोन आहे़ तालुक्यात जिल्हा परिषद सदस्यांची संख्या ९ आहे तर पंचायत समिती सदस्यांची संख्या १८ आहे़ लातूर महानगरपालिकेतील सदस्यांची संख्या ७५ अशी आहे़ सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, नागरिक, मजूर हे चारा, पाणी, रोजगार अशा विविध समस्यांमध्ये अडकले आहेत़ त्यामुळे नागरिकांच्या किमान पाणी, चारा, रोजगार अशा समस्या तरी सुटाव्यात म्हणून लातूर शहरचे आमदार अमित देशमुख यांनी जानेवारी ते आजपर्यंत चार बैठका घेतल्या आहेत़ या बैठकांमध्ये प्रशासकीय अधिकार्यांना टंचाई निवारणासंदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना केल्या आहेत़ तसेच पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून नागझरी, साई, महापूर, कातपूर, साखरा, रेणापूर तालुक्यातील इटी या गावांना भेटी देऊन पाहणी केली आहे़ त्याचबरोबर शेतकर्यांशी संवाद साधला आहे़
तालुक्यातील काही गावे ही ग्रामीण विधानसभा मतदारसंघात येत आहेत़ आमदार अमित देशमुख यांच्या बैठकीतच आमदार त्र्यंबक भिसे यांनीही टंचाईचा आढावा घेतला आहे़ पक्षाच्या वतीने आखण्यात आलेल्या धोरणानुसार पक्षातील ज्येष्ठ नेतेमंडळींच्या उपस्थितीत शेतकरी मेळावे घेण्यात आले आहेत़ तसेच पक्षाच्या सूचनेनुसार आंदोलन करण्यात आले आहे़
चौकट़़़
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांचे गाव कव्हा आहे़ या गावात सध्या कव्हेकर यांच्यातर्फे एक टँकर सुरु आहे़ या व्यतिरिक्त तालुक्यातील एकाही जिल्हा परिषद सदस्याने अथवा पंचायत समिती सदस्याने वैयक्तिकरित्या नागरिकांना मदत केली नसल्याचे पहावयास मिळत आहे़ पंचायत समितीच्या पदाधिकार्यांसह ठराविक सदस्यांनी दोन आठवड्यांपूर्वी केवळ एका पाणीपातळीची पाहणी केली आहे़
सात नगरसेवकांचा पुढाकाऱ़़
शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने सात नगरसेवकांनी शहरात सात मोफत टँकर सुरु केले आहेत़ त्यामुळे सदरील भागातील टंचाई निवारणासाठी मदत झाली आहे़