स्टेटस रिपोर्ट देण्यास गुजरातला अखेरची संधी, बिल्किस बानो प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 04:50 AM2018-03-13T04:50:07+5:302018-03-13T04:50:07+5:30
गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या बिल्किस बानो बलात्कार प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या पोलीस अधिकाºयांवर शिस्तभंगाची काय कारवाई केली? असा सवाल करत या प्रकरणी स्टेटस रिपोर्ट सादर करण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला अखेरची संधी दिली आहे.
नवी दिल्ली : गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या बिल्किस बानो बलात्कार प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या पोलीस अधिकाºयांवर शिस्तभंगाची काय कारवाई केली? असा सवाल करत या प्रकरणी स्टेटस रिपोर्ट सादर करण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला अखेरची संधी दिली आहे. या प्रकरणी उत्तर देण्यासाठी सहा आठवड्यांचा अवधी दिला आहे.
गुजरातमध्ये ३ मार्च २००२ रोजी उसळलेल्या हिंसाचारानंतर पळून जात असताना गर्भवती बिल्किस बानोवर रंधीकपूर गावात सामूहिक बलात्कार झाला होता. जानेवारीमध्ये झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला विचारणा केली होती की, दोषी पोलीस अधिकाºयांवर काय कारवाई केली याचा अहवाल सादर करा. तसेच, बिल्किसला भरपाईसाठी दाखल याचिकेवर सरकारची प्रतिक्रियाही मागविली होती. बॉम्बे हायकोर्टाने ४ मे रोजी या प्रकरणी १२ जणांना आजीवन कारावास सुनावला होता.