आरटीई प्रवेशाचा आज अखेरचा दिवस

By admin | Published: April 26, 2016 12:16 AM2016-04-26T00:16:33+5:302016-04-26T00:16:33+5:30

नाशिक : शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई)राज्याच्या शिक्षण विभागाच्या वतीने आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. या नोंदणी प्रक्रियेमध्ये येणार्‍या काही तांत्रिक अडचणींमुळे मुदतवाढ देण्यात आली असून नोंदणीचा मंगळवार(दि.२६) अखेरचा दिवस आहे.

The last day of RTE admission today | आरटीई प्रवेशाचा आज अखेरचा दिवस

आरटीई प्रवेशाचा आज अखेरचा दिवस

Next
शिक : शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई)राज्याच्या शिक्षण विभागाच्या वतीने आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. या नोंदणी प्रक्रियेमध्ये येणार्‍या काही तांत्रिक अडचणींमुळे मुदतवाढ देण्यात आली असून नोंदणीचा मंगळवार(दि.२६) अखेरचा दिवस आहे.
आरक्षित जागांकरिता विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा नाशिकमध्ये पथदर्शी प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाअंतर्गत अद्याप तीन हजार ४४३ विद्यार्थ्यांचे अर्ज निश्चित करण्यात आले आहे. शिक्षण हक्क प्रवेशासाठी एकूण पाच हजार १६७ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहे. मंगळवारी नोंदणीची शेवटची संधी असल्याचे प्रशासकिय सुत्रांनी सांगितले आहे. ऑनलाइन अर्जाची नोंदणी करताना सुरु वातीला वारंवार तांंत्रिक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत होता. याबाबत प्रशासनाकडे तक्रारीही वाढल्या होत्या. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेने दखल घेत येणार्‍या तांत्रिक अडचणी दूर क रण्यास यश मिळविले आहे. यामुळे सोमवारी प्रवेश प्रक्रिया बंद करण्यात येणार होती; मात्र एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनाही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहमध्ये आणण्यासाठी शासनाचा हा प्रकल्प असून तो अधिकाधिक सक्षमपणे शहरासह जिल्‘ात राबविला जावा, यासाठी प्रशासकीय यंत्रणा प्रयत्नशाील आहे. अद्याप तीन वेळा मुदतवाढ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जेणेकरुन विद्यार्थी-पालकांची होणारी गैरसोय टाळता यावी आणि तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, याची खबरदारी महापालिका व जिल्हा परिषदेकडून घेतली जात आहे. पालकांनी डब्ल्यूडब्ल्यू.आरटीई२५ॲडमिशन.महाराष्ट्र.गर्व्हन्मेंट.इन या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन प्रवेशाचा अर्ज करावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

Web Title: The last day of RTE admission today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.