'ती' सरप्राईज भेट अखेरची ठरली; शहीद कर्नल शर्मांच्या भावानं सांगितली आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 12:27 PM2020-05-04T12:27:20+5:302020-05-04T12:30:20+5:30
हंदवाड्यात दहशतवाद्यांशी लढताना कर्नल शर्मांना वीरमरण
जयपूर: काश्मीरच्या हंदवाड्यात दहशतवाद्यांशी दोन हात करताना कर्नल, मेजरसह दोन जवानांना वीरमरण आलं. गेल्या पाच वर्षांत प्रथमच देशानं कर्नल दर्जाचा अधिकारी गमावला. कायम युनिटला प्राधान्य देणारा अधिकारी हरपल्यानं त्यांच्या सहकाऱ्यांनी दु:ख व्यक्त केलं. आशुतोष यांचे बंधू पियुष यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. गेल्या वर्षी होळीवेळी झालेली भेट अखेरची ठरल्याचं पियुष यांनी सांगितलं.
गेल्या वर्षी होळीच्या एक दिवस आधी आशुतोष कोणालाही न कळवता आला. त्याची भेट सगळ्यांसाठी आश्चर्याचा सुखद धक्का होता. होळी पेटवली जात असताना संध्याकाळी साडे सातच्या सुमारास आशुतोष अचानक आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही खूप धमाल केली, अशा शब्दांत पियुष यांनी आशुतोष यांची आठवण सांगितली. आशुतोष यांची पत्नी पल्लवी आणि १२ वर्षांची मुलगी तमन्ना गेल्या अडीच वर्षांपासून जयपूरमध्ये वास्तव्यास आहेत.
काश्मीरच्या हंदवाड्यात काल दहशवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली. एका घरात दहशतवादी लपले असून त्यांनी स्थानिकांना ओलीस ठेवल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. त्यानंतर सुरक्षा दलांनी जम्मू काश्मीर पोलिसांसह संयुक्त कारवाई सुरू केली. दहशतवाद्यांशी दोन हात करताना कर्नल, मेजरसह दोन जवान शहीद झाले. यामध्ये जम्मू काश्मीर पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याला वीरमरण आलं.
घरी परतणाऱ्या मजुरांचा खर्च उचलणार काँग्रेस, सोनिया गांधींची मोठी घोषणा
गरीब मजूरांकडून तिकीटाचे पैसे घेऊ नका, मुख्यमंत्र्यांची केंद्र सरकारला विनंती
... तर लॉकडाऊनचे नियम मोडून रस्त्यावर उतरु, खासदार जलील यांचा इशारा