अंतिम क्षणी निकाल बदलणार; मनोज तिवारींना अजुनही विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 02:03 PM2020-02-11T14:03:11+5:302020-02-11T14:04:25+5:30
दिल्ला विधानसभा निवडणुकीत भाजपने, दिग्गज मंत्र्यांची फौज निवडणूक प्रचारात उतरवली होती. मात्र, दिल्लीकरांनी 'आप'च्याच पारड्यात मतं टाकली आहे. मात्र मनोज तिवारी यांना अजुनही फेरबदल होण्याची आशा आहे.
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. दिल्लीकरांनी आम आदमी पार्टीला स्पष्ट कौल दिला आहे. 'आप'ने ५६ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप १४ मतदारसंघांत पुढे आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा एकदा आपचं सरकार येणार हे निश्चित झालं आहे. मात्र दिल्ली भाजपचे प्रमुख मनोज तिवारी यांना अजुनही अंतिम क्षणी निकाल बदलेल असा विश्वास आहे.
दिल्ला विधानसभा निवडणुकीत भाजपने, दिग्गज मंत्र्यांची फौज निवडणूक प्रचारात उतरवली होती. मात्र, दिल्लीकरांनी 'आप'च्याच पारड्यात मतं टाकली आहे. मात्र मनोज तिवारी यांना अजुनही फेरबदल होण्याची आशा आहे.
मनोज तिवारी म्हणाले की, भाजपला मतचाचण्यांमध्ये केवळ दोन जागा दाखवल्या होत्या. मात्र भाजपला 22 जागा मिळाल्या आहेत. अजुनही मतमोजणी सुरू आहे. त्यापैकी 27 जागांवर भाजप 700 ते 100 मतांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे पुढील मतमोजणीत एखाद्या फेरीत निकाल बदलू शकतो, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.