बिहार निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात ५९.४६ टक्के मतदान

By admin | Published: November 5, 2015 05:34 PM2015-11-05T17:34:35+5:302015-11-05T18:30:12+5:30

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील राज्याच्या नऊ जिल्ह्यातील ५७ जागांसाठी ५९.४६ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

In the last phase of Bihar elections, 59.46 percent of the polling was held | बिहार निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात ५९.४६ टक्के मतदान

बिहार निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात ५९.४६ टक्के मतदान

Next

ऑनलाइन लोकमत 

पाटणा, दि. ५ -  बिहार विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील राज्याच्या नऊ जिल्ह्यातील ५७ जागांसाठी  ५९.४६ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. जदयूचे वरिष्ठ नेते बिजेंद्रप्रसाद यादव, राजदचचे अब्दुलबारी सिद्दीकी आदी दिग्गज नेत्यांसह ८२९ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. 
गुरुवारी मतदान सुरु झाल्यावर काही ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड असल्याच्या तक्रारी समोर आल्या. दरभंगामधील बेनीपूरमधील मतदान केंद्रावर एका कर्मचा-याचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याने काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. 
बिहार मधील जनतेने उमेदवारांचे  भवितव्य मतपेटीत बंद केले आहे.  रविवारी ८ नोव्हेंबरला निवडणूकिचा निकाल(मतमोजणी) जाहिर करण्यात येणार आहे.  कोण दिवाळी साजरी करणार आणि कोणाच दिवाळ निघणार याकडे सर्व देशाचं लक्ष लागले आहे. 
लालू प्रसाद यादव यांनी महागठबंधनला बिहारमध्ये १९० जागा निवडून येतील त्यापेक्षा एकही कमी येणार नाही असा दावा केला आहे. प्रत्येक पक्षाच्या नेत्याने जोरदार प्रचार केला आहे.  
 

Web Title: In the last phase of Bihar elections, 59.46 percent of the polling was held

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.