तीन वर्षांमध्ये 8 लाख भाविकांनी घेतले अमरनाथाचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 03:27 PM2018-01-17T15:27:20+5:302018-01-17T15:29:16+5:30
गेल्या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये 8 लाख लोकांनी अमरनाथाचे दर्शन घेतल्याची माहिती जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विधानसभेत आज गेण्यात आली. यासंदर्भात नॅशनल कॉन्फरन्सचे सदस्य मियाँ अल्ताफ अहमद यांनी माहिती विचारली होती.
जम्मू- गेल्या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये 8 लाख लोकांनी अमरनाथाचे दर्शन घेतल्याची माहिती जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विधानसभेत आज गेण्यात आली. यासंदर्भात नॅशनल कॉन्फरन्सचे सदस्य मियाँ अल्ताफ अहमद यांनी माहिती विचारली होती.
आरोग्यमंत्री बली भगत यांनी अल्ताफ यांच्या प्रश्नावर सादर केलेल्या लिखित उत्तरात 2015मध्ये सर्वोच्च म्हणजे 3 लाख 52 हजार 771 भाविकांनी दर्शन घेतल्याचे स्पष्ट केले. हिजबुल मुजाहिदिनचा कमांडर बुरहान वानीला मारल्यानंतर काश्मीर खोऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे 2016 मध्ये भक्तांची संख्या कमी झाली होती. यावर्षात 2 लाख 20 हजार 490 लोकांनी अमरनाथ यात्रा केली होती.
मागच्यावर्षी या संख्येत वाढ होऊन भक्तांची संख्या 2 लाख 60 हजार 3वर जाऊन पोहोचल्याचे त्यांनी उत्तरात म्हटले आहेय
गेल्या वर्षी अमरनाथाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या प्रवाशांच्या बसवर झालेल्या हल्ल्यामध्ये 15 जणांचे प्राण गेले होते. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणारी ही यात्रा पहलगाम आणि बाल्ताल अशा दोन मार्गांनी केली जाते. पहलगाममार्गे अमरनाथ गुहेपर्यंत पोहोचण्यासाठी 45 किमी अंतर पार करावे लागते तर बाल्ताल मार्ग 16 किमीचा आहे.
2017मध्ये 1 कोटी परदेशी पर्यटकांनी दिली भारताला भेट
2017 हे वर्ष भारतीय पर्यटन क्षेत्राला नवी ऊर्जा देणारे ठरले आहे. या वर्षभरात भारताला 1 कोटी पर्यटकांनी भेट
दिली आहे. त्यामुळे भारताला 27 अब्ज डॉलर्स इतके उत्पन्नही मिळाले आहे. परदेशी पर्यटकांनी भारतात येण्याचा हा नवा उच्चांक प्रस्थापित झाल्यामुळे या क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. 2018मध्येही अशाच प्रकारे मोठ्या संख्येने पर्यटक भारतात येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
याबाबत कोची येथे बोलताना केंद्रीय पर्यटन मंत्री के. जे. अल्फोन्सम्हणाले, "पर्यटन क्षेत्राची वाढ चांगल्या प्रकारे होत आहे. भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीला देण्यासारखं सर्वकाही उपलब्ध असल्यामुळे पर्यटकांची संख्या अजूनही भरपूर वाढेल अशी मला आशा आहे. लोकांना सेवादेण्यासाठी आम्ही आणखी प्रयत्न करत आहोत."
देशाच्या जीडीपीमध्ये पर्यटनक्षेत्राचा वाटा 6.88 टक्के इतका असून 2017मधील एकूण रोजगारांमध्ये 12 टक्के रोजगार या क्षेत्रात होते. असेही अल्फोन्स म्हणाले. यामुळे टुरिझम कॉम्पिटिटिव्ह इंडेक्समध्ये भारताची क्रमवारी सुधारली आहे. 2013 साली भारताचा क्रमांक 65 होता तो आता 2017 साली 25 वर गेला आहे. केंद्र सरकारने सुरु केलेल्या नव्या स्वदेश दर्शन योजनेमुळे पायाभूत सुविधांचा विकास झाला आहे आणि त्यामुळे पर्यटन क्षेत्राचा विकास होत असल्याचे मत मांडले जात आहे. त्याचप्रमाणे ईशान्य भारतातील राज्यांमध्येही पर्यटन क्षेत्र वृद्धींगत होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत त्यामुळेही पर्यटकांची संख्या वाढत आहे.