मागील वर्षी सर्वाधिक मुले घेतली गेली दत्तक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 04:09 AM2019-05-28T04:09:06+5:302019-05-28T04:09:20+5:30
देशात वर्ष २०१८-१९ मध्ये २३९८ मुलींसह ४००० पेक्षा अधिक मुलांना दत्तक घेण्यात आले आहे. दत्तक घेण्यात येणाऱ्या मुलांची गत पाच वर्षांतील ही सर्वाधिक संख्या आहे.
नवी दिल्ली : देशात वर्ष २०१८-१९ मध्ये २३९८ मुलींसह ४००० पेक्षा अधिक मुलांना दत्तक घेण्यात आले आहे. दत्तक घेण्यात येणाऱ्या मुलांची गत पाच वर्षांतील ही सर्वाधिक संख्या आहे. चाइल्ड अॅडॉप्शन रिसोर्स अॅथॉरिटीने (सीएआरए) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, वर्ष २०१८-१९ मध्ये एकूण ४०२७ मुलांना दत्तक घेण्यात आले. यात जवळपास ३३७४ मुले देशात, तर ६५३ मुले देशाबाहेर दत्तक घेण्यात आली. या आकडेवारीनुसार २०१७-१८ मध्ये ३९२७ मुले, २०१६-१७ मध्ये एकूण ३७८८ मुले आणि २०१५-१६ मध्ये एकूण ३६७७ मुले दत्तक घेण्यात आली.
महिला व बालविकास मंत्रालयाच्या एका अधिकाºयाने सांगितले की, लोकांचा मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. कारण, दरवर्षी मुलांच्या तुलनेत मुली अधिक प्रमाणात दत्तक घेतल्या जातात.
या आकडेवारीनुसार सर्वाधिक मुले महाराष्ट्रातून दत्तक घेण्यात आली. यात ८४५ मुले दत्तक घेण्यात आली असून, यात ४७७ मुली आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात सर्वाधिक संख्येत मुले दत्तक घेण्यात आली, कारण तेथे अनाथ मुलांचा सांभाळ
करणाºया, दत्तक संस्थांची संख्या अधिक आहे.
>कर्नाटकही आघाडीवर
महाराष्ट्रानंतर कर्नाटकचा नंबर आहे. या राज्यातून २८१ मुले दत्तक घेण्यात आली. यानंतर ओडिशाचा नंबर आहे, येथून २४४ आणि मध्यप्रदेशातून २३९ मुलांना दत्तक घेण्यात आले.हरियाणातही मुलांच्या तुलनेत मुलींना दत्तक घेणाºयांची संख्या अधिक आहे. दत्तक घेण्यात आलेल्या एकूण ७२ मुलांमध्ये ४५ मुली आहेत. या आकडेवारीनुसार, दिल्लीत दत्तक घेण्यात आलेल्या १५३ मुलांमध्ये १०३ मुली आहेत.