सरत्या वर्षातील अखेरची 'मन की बात', 'पुणे गर्ल'चा उल्लेख मोदींच्या भाषणात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 03:20 PM2018-12-30T15:20:00+5:302018-12-30T15:20:42+5:30

यंदाच्या वर्षातच भारताला संयुक्त राष्ट्राकडून पर्यावरणाबाबत सर्वोच्च पुरस्कार मिळाला.

Last year's 'Man Ki Baat', 'Man Ki Baat', was mentioned in Modi's speech | सरत्या वर्षातील अखेरची 'मन की बात', 'पुणे गर्ल'चा उल्लेख मोदींच्या भाषणात

सरत्या वर्षातील अखेरची 'मन की बात', 'पुणे गर्ल'चा उल्लेख मोदींच्या भाषणात

Next

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनीमन की बात कार्यक्रमात बोलताना देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यंदाच्या वर्षातील अखेरची 'मन की बात' करताना मोदींनी गतवर्षीच्या आठवणींना उजाळा दिला. यंदाच्या वर्षातील मोदींची ही 51 वी मन की बात होती. त्यामध्ये 2018 हे वर्ष भारतीयांसाठी अभिमानाचे ठरल्याचं मोदींनी म्हटलं. 

वर्ष 2018 मध्ये जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना ‘आयुष्मान भारत’ची सुरुवात झाली. देशाच्या प्रत्येक गावापर्यंत वीज पोहोचली. विशेष म्हणजे जगाला आपली ताकद दिसून आली. भारत विक्रमी गतीने देशातील नागरिकांना गरिबीपासून मुक्त करत आहे, असे मोदी म्हणाले. जगातील अनेक संस्थांनी भारताचे सामर्थ्य मान्य केल्याचंही मोदी म्हणाले.

यंदाच्या वर्षातच भारताला संयुक्त राष्ट्राकडून पर्यावरणाबाबत सर्वोच्च पुरस्कार मिळाला. तसेच, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या उभारण्यात आलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचीही जगभरात चर्चा झाली. तर, अंडर-19 क्रिकेट विश्व चषक आणि ब्‍लाइंड क्रिकेट विश्व चषकात भारताने जबरदस्त कामगिरी केली आहे. आशियन खेळांतही भारताने मोठ्या संख्येने पदके जिंकल्याची आठवण मोदींनी सांगितली. विशेष म्हणजे, मोदींनी या कार्यक्रमात पुण्यातील वेदांगी कुलकर्णीचे कौतुक केलं. वेदांगीने सायकलवरून जगाची फेरी पूर्ण केली. ती सर्वात लवकर जगाची फेरी पूर्ण करणारी आशियन बनल्याचे मोदींनी सांगितले. 





Web Title: Last year's 'Man Ki Baat', 'Man Ki Baat', was mentioned in Modi's speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.