स्वधर्मे निधनं श्रेय:

By Admin | Published: February 10, 2016 05:17 PM2016-02-10T17:17:37+5:302016-02-10T17:17:37+5:30

जग निराश होईल परंतु बटालियन नाही. आणि खरंच चमत्कार झाला, एक जवान हणमंतप्पा जिवंत आढळला. अन्न पाण्याशिवाय बर्फाच्या २५ फूट ढिगा-याखाली तो सहा दिवस तग धरून होता

Late credits: | स्वधर्मे निधनं श्रेय:

स्वधर्मे निधनं श्रेय:

googlenewsNext
>कर्नल देवदत्त विजय पाटणकर
(निवृत्त कमांडिग ऑफिसर, १९ मद्रास रेजिमेंट)
 
स्वधर्मे निधनं श्रेय: हे आहे लष्कराच्या मद्रास रेजिमेंटचं घोषवाक्य. सगळ्या प्रकारच्या भूप्रदेशांमध्ये आणि वातावरणामध्ये उच्च दर्जाची कामगिरी करणारी ही एक सर्वात जुन्या रेजिमेंटपैकी एक आहे. मद्रास रेजिमेंटच्या वैभवशाली परंपरेतून  १९६६ मध्ये १९ वी बटालियन तयार करण्यात आली जी कर्नाटिक इन्फ्रान्टीशी संलग्न आहे.
या नवजात बटालियनसाठी आगामी वर्षे आव्हानात्मक होती, ज्या वर्षांमध्ये या बटालियनचा कस लागला. जम्मू व काश्मिरमधल्या अतिउंच ठिकाणांवरील कामगिरी असो वा मणीपूरमधलं पोस्टिंग असो या नव्यानंच स्थापन करण्यात आलेल्या बटालियननं सगळ्या आव्हानांना समर्थपणे तोंड दिलं. १९७१ च्या युद्धात सहभाग घेतल्यानंतर ही बटालियन ईशान्य भारतात कार्यरत होती आणि तिथल्या अतुलनीय कामगिरीसाठी या बटालियनला गौरवण्यातही आले होते.
अशी भव्य परंपरा असलेल्या या रेजिमेंटचे जवान जगातल्या सगळ्यांत उंच अशा युद्धभूमीवर पराक्रम गाजवण्यासाठी गेले परंतु ईश्वराच्या मनात काहितरी वेगळंच होतं. या महिन्याची ३ तारीख उगवलीच ती दु:खद वार्ता घेऊन. सियाचेनमध्ये हिमस्खलन झालं आणि एक किलोमीटर रुंद व ६०० मीटर उंच असा प्रचंड हिमनग मद्रास रेजिमेंटच्या १९व्या बटालियनच्या चेकपोस्टवर काळ बनून आला.
 
ही चौकी समुद्रसपाटीपासून १९,६०० फूटांवर आहे आणि या बना चौकीजवळच पाकिस्तानची सीमारेषा आहे. या धक्कादायक बातमीबरोबरच अंगावर काटा आणणारं वृत्त कळलं की ज्युनिअर कमांडिग ऑफिसरसह एकूण १० जवान या हिमस्खलनात जिवंत गाडले गेले आहेत. परिस्थिती अशी की देवाकडे मदतीची याचना करूनही पदरी काही पडायची शक्यता कमी.
शेवटचा रेडियो सिग्नल ११ वाजण्याच्या सुमारास मिळाला आणि लगेच बचाव पथके तिथं रवाना झाली. वातवरण आणि अंधुक प्रकाश यांचा विचार करता या पथकाला कल्पनेनंच परिस्थितीचा अंदाज घ्यावा लागला आणि पाच मोठी भुयारं खणण्याचं काम हाती घ्यावं लागलं. तुम्ही या बचाव पथकात आहात असा विचार करा, आणि बर्फाखाली गाडले गेलेल्या १० जवानांसाठी तुम्हाला प्रयत्नांची शिकस्त करायची आहे याचा विचार करून काय स्थिती ओढवेल याचा अंदाज बांधा. विशिष्ट उपकरणांच्या सहाय्यानं हे जवान बर्फ कापत होते, यावेळी या भागामधलं तापमान होतं उणे ४५ ते उणे २५ या पातळ्यांमध्ये. सगल सहा दिवस तुफानी वारे होते, कमी प्रकाश होता आणि शून्यापेक्षा कमी तापमानात काम करायचं होतं.
 
आपल्या सीमांचं जे रक्षण करतात, ते किती धैर्यवान असतील याची यावरून कल्पना यावी. वयाच्या २२व्या वर्षी सैन्यात भरती झाल्यापासून सलग २५ वर्षे या बटालियनशी माझं नातं जुळलेलं आहे. मी देवापाशी एकच प्रार्थना करतो या शूरवीरांप्रती थोडी दयाबुद्धी दाखव. एकमेकांप्रती असलेला जिव्हाळा हे या बटालियनचं वैशिष्ट्य आहे. बुद्धी आणि तर्क विश्वावर अधिराज्य गाजवतात असं म्हटलं जातं, परंतु मला वाटतं, या तुकडीबरोबर असताना ह्रदय हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. लष्कराच्या तुकडीमध्ये ह्रदयाचं स्थान हे नेहमीचं सर्वोच्च राहिलेलं आहे असा माझा विश्वास आहे कारण आम्ही, सगळे एक, मिळून लष्कराची तुकडी असतो. ही खोलवर रुजलेली बंधुत्वाची भावना घोषवाक्याला पुढे नेते. आणि नमक, इज्जत आणि निशानसाठी बचावकार्य कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी कुणीतरी, एखादातरी जवान जिवंत आढळेल या आशेने गाडले गेलेल्यांचा शोध घेण्यासाठी बळ देते. बटालियननं कधीच परिस्थितीपुढे हार नाही पत्करली हेच यातून दिसून आलं. ज्यांनी आशा सोडल्या आहेत, त्यांना मी एकच सांगेन, जग निराश होईल परंतु बटालियन नाही. आणि खरंच चमत्कार झाला, एक जवान हणमंतप्पा जिवंत आढळला. अन्न पाण्याशिवाय बर्फाच्या २५ फूट ढिगा-याखाली तो सहा दिवस तग धरून होता. 
गेले सहा दिवस देहभान विसरून अथकपणे बचावकार्य करणा-यांसाठी हा अत्यानंदाचा क्षण होता. दुर्दैव इतकंच की अन्य जवान नशीबवान नव्हते. इतर जवानांचे मृतदेह सापडले, त्यांचा अनंताकडे प्रवास सुरू झाला. १९व्या मद्रास रेजिमेंटच्या जवानांना ब्रिगेडियर माजिंदर सिंग (१९ मद्रास रेजिमेंट) यांच्या मुलीने अमानत भोपारायने लिहिलेल्या या ओळी अर्पण:
 
“Snow all around you, no directions to guide, 
Digging could let you out or deeper inside.
 
Your buddies trying to find you with all their might,
And God I am sure that they are putting up a good fight.
 
Our thoughts and prayer’s are forever with you 
Hopeful you will return 
back to the unit and the 
Families you yearn.
 
Fate however does not seem to be on our side 
For only one of you makes it out alive. 
 
The Tricolour lies in wait for the rest
For it drapes only the very best.”
 
मृतात्म्यांना शांती लाभो!

Web Title: Late credits:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.