68 लाख फेसबुक युजर्सच्या फोटोंचा गैरवापर; तुम्ही नाही ना यातले एक? 'असं' करा चेक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 01:40 PM2018-12-18T13:40:21+5:302018-12-18T14:21:32+5:30
फेसबुकवर युजर्सचा डेटा लीक होण्याचा धोका आहे. 68 लाख युजर्सच्या खासगी फोटोंचा अॅक्सेस थर्ड पार्टीला मिळाला होता, अशी माहिती आता समोर आली आहे.
नवी दिल्ली - फेसबुक हे संवाद साधण्याचं उत्तम माध्यम आहे. मात्र सातत्याने फेसबुकवर युजर्सचा डेटा लीक होण्याचा धोका आहे. 68 लाख युजर्सच्या खासगी फोटोंचा अॅक्सेस थर्ड पार्टीला मिळाला होता अशी माहिती आता समोर आली आहे. पण या फोटोचा गैरवापर झाला की नाही, याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकारामुळे पुन्हा एकदा फेसबुकच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एका हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकवर अपलोड करण्यात आलेले युजर्सचे खासगी फोटो पाहण्याचा अॅक्सेस थर्ड पार्टीला मिळाला होता. कंपनीने दिलेल्या एका वृत्तानुसार, 13 डिसेंबर ते 25 डिसेंबरपर्यंत युजर्सच्या खासगी फोटोंसंबंधी जवळपास 1500 अॅप्सला हा अॅक्सेस देण्यात आला होता. मात्र त्यानंतर ही चूक आता सुधारण्यात आली आहे. परंतु, या दरम्यान, या फोटोचा गैरवापर झाला की नाही, याबाबत अनेकांच्या मनात शंका आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, थर्ड पार्टी अॅपला टाईमलाइनशिवाय स्टोरीजमधील शेअर करण्यात आलेल्या फोटोला हा अॅक्सेस देण्यात आला होता. यावेळी तुम्ही तुमचे खासगी फोटो अपलोड केले परंतु, ते पब्लिकली शेअर केले नव्हते. त्या फोटोंना सुद्धा शेअर करण्याचा अॅक्सेस थर्ड पार्टीला या दरम्यान मिळाला होता, त्यामुळे तुमच्या फोटोचा गैरवापर झाला की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
असं करा चेक
- फेसबुकच्या या बगमुळे तुमच्या फोटोजला काही धक्का लागला की नाही. हे तपासण्यासाठी तुम्ही या लिंक वर क्लिक करू शकतात.
- लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फेसबुक अकाउंटवरून लॉग इन करावे लागणार आहे.
- जर तुमच्या फोटोला काही धक्का लागला असेल तर तुम्हाला काय करावे लागेल, यासंबंधीची सर्व माहिती या पेजवर देण्यात आली आहे.