खराब हवामानात ममता बॅनर्जींचे हेलिकॉप्टर अडकले; लष्कराच्या एअरबेसवर इमर्जन्सी लँडिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 03:48 PM2023-06-27T15:48:01+5:302023-06-27T15:49:54+5:30
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे लँडिंग करावे लागले आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या जलपायगुडीतील क्रांती येथे जाहीर सभेला संबोधित केल्यानंतर बागडोगरा येथे जात होत्या. पावसामुळे दृश्यमानता खूपच कमी झाली, त्यानंतर त्यांच्या हेलिकॉप्टरला उत्तर बंगालमधील सलुगारा येथील आर्मी एअरबेसवर आपत्कालीन लँडिंग करावे लागले.
"मोदीजी, मेक इन इंडिया म्हणता, मग गावागावात चायना बाजार का भरतो?"
तृणमूल काँग्रेसचे नेते राजीव बॅनर्जी यांनी या संदर्भात माहिती दिली. ते सुरक्षित आहेत. सीएम ममता बॅनर्जी आता रस्त्याने कोलकाता येथे येत आहेत.
दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी जलपायगुडी येथे पंचायत निवडणुकीसंदर्भात एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली, भाजपला आपला पराभव कळला आहे, त्यामुळेच विविध समाज आणि संघटनांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत नाही.
पश्चिम बंगालमध्ये ८ जुलै रोजी पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यापूर्वी नामांकनादरम्यान राज्याच्या विविध भागातून हिंसाचार झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. हिंसाचाराच्या संदर्भात भाजप उच्च न्यायालयात गेले होते, तेथून केंद्रीय निमलष्करी दलाच्या तैनातीचा आदेश जारी करण्यात आला होता. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पश्चिम बंगाल सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली पण त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही.
एक दिवस आधी सोमवारी ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला होता. पीएम मोदींच्या अमेरिका दौऱ्यावर निशाणा साधत सीएम ममता बॅनर्जी म्हणाल्या, मोदी बाबू अमेरिकेत जाऊन पैशाची उधळपट्टी करत आहेत. कधी ते रशियात जातात, तर कधी इतरत्र आपल्या लोकांना इथे पैसे मिळत नाहीत.