बांधकाम मजुरासमोर रोजगाराचा प्रश्न कायम जिल्‘ातील ६३ हजार मजुरांवर उपासमारीची वेळ लातूर : मागील दोन वर्षांपासून पावसाने ओढ दिल्याने लातूर जिल्‘ात तीव्र पाणीटंचाई

By admin | Published: September 15, 2015 06:48 PM2015-09-15T18:48:53+5:302015-09-16T00:33:54+5:30

मागील दोन वर्षांपासून पावसाने ओढ दिली असल्याने समाधानकारक पाऊस नाही़ पाऊस नसल्याने शेतीत पिके नाहीत़ पिकांनाही पाणी नाही आणि पिण्यासाठीही पाणी नाही़ त्यामुळे तिव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ एकूणन दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे़ याचा परिणाम अन्य कामासोबतच बांधकामावरही झाला आहे़ लातूर शहरात महापालिकेने तर जिल्‘ात ग्र्रामपंचायतीने बांधकाम परवाने देणे बंद केले आहे़ सुरु असलेल्या बांधकामावर महापालिका प्रशासन धाड टाकून सामान जप्त करत आहे़ त्यामुळे शहरासह जिल्‘ात ७० टक्के बांधकाम बंद आहेत़ कामे बंद झाली़ त्यामुळे बांधकाम मजुरांपुढे रोजगाराचा प्रश्न कायम आहे़ मागील तीन महिन्यांपासून हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर येत आहे़ एकूणच महापालिका प्रशासनाने पाणी बचतीच्या नावावर बांधकामे बंद केली

Latur: The time of hunger for 63 thousand laborers in the district: Latur: In past two years due to torrential rain, severe water shortage in Latur district | बांधकाम मजुरासमोर रोजगाराचा प्रश्न कायम जिल्‘ातील ६३ हजार मजुरांवर उपासमारीची वेळ लातूर : मागील दोन वर्षांपासून पावसाने ओढ दिल्याने लातूर जिल्‘ात तीव्र पाणीटंचाई

बांधकाम मजुरासमोर रोजगाराचा प्रश्न कायम जिल्‘ातील ६३ हजार मजुरांवर उपासमारीची वेळ लातूर : मागील दोन वर्षांपासून पावसाने ओढ दिल्याने लातूर जिल्‘ात तीव्र पाणीटंचाई

Next

मागील दोन वर्षांपासून पावसाने ओढ दिली असल्याने समाधानकारक पाऊस नाही़ पाऊस नसल्याने शेतीत पिके नाहीत़ पिकांनाही पाणी नाही आणि पिण्यासाठीही पाणी नाही़ त्यामुळे तिव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ एकूणन दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे़ याचा परिणाम अन्य कामासोबतच बांधकामावरही झाला आहे़ लातूर शहरात महापालिकेने तर जिल्‘ात ग्र्रामपंचायतीने बांधकाम परवाने देणे बंद केले आहे़ सुरु असलेल्या बांधकामावर महापालिका प्रशासन धाड टाकून सामान जप्त करत आहे़ त्यामुळे शहरासह जिल्‘ात ७० टक्के बांधकाम बंद आहेत़ कामे बंद झाली़ त्यामुळे बांधकाम मजुरांपुढे रोजगाराचा प्रश्न कायम आहे़ मागील तीन महिन्यांपासून हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर येत आहे़ एकूणच महापालिका प्रशासनाने पाणी बचतीच्या नावावर बांधकामे बंद केली आहेत़ बांधकाम मजुरांसाठी मात्र उपाययोजना नाही़ तीन महिन्यांपासून हाताला काम नसल्याने जे मजूर ग्रामीण भागातून येऊन शहरात राहतात़ त्यांची तीन-तीन महिन्याचे घरभाडे थकल्याचेही ते सांगत आहेत़ तर काही मजुरांना इथे काम मिळत नसल्याने १५ दिवस पुण्यात काम करुन पुन्हा १५ दिवसांनी गावाकडे अशी ये-जा करावी लागत आहे़ नोंदणीकृत मजुरांनी कामगार आयुक्तांकडे तीन हजार अनुदानासाठीचे प्रस्ताव मागील सहा महिन्यांपासून मार्च पर्यंत १ हजार ७५७ प्रलंबीत आहेत़ तर मार्च नंतर संबंधीत विभागाचे अधिकारी कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने हजारो प्रस्ताव धुळखात पडून आहेत़ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसह अन्य विविध योजनेच्या आणि नोंदणीचे प्रस्ताव ढिगार्‍यानिशी पडून आहेत़ अशा परिस्थितीत कामगारांना या नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीला तोंड द्यावे लागत आहे़ तसेच दैनंदीन रोजगार मिळेल या आशेवर दररोज सकाळी गोलाई परिसरात तर काही कामगार शिवाजी चौकात कामाच्या शोधात येतात़ दिवसभर थांबतात आणि संध्याकाळी रिकाम्या हातानेच घराकडे परतात़ त्यांच्या या दैनंदिन येण्या-जाण्याने मनाची मात्र घुसमट होत आहे़ शेजार्‍या-पाजार्‍याकडे उसनवारी करुनही काही महिने ढकलले़ आता शेजार्‍या बाजार्‍यांचेही हात अखडले जात आहेत़ शासन मात्र काहीच करीत नाही, अशी खंत कामगारांकडून व्यक्त होत आहे़

Web Title: Latur: The time of hunger for 63 thousand laborers in the district: Latur: In past two years due to torrential rain, severe water shortage in Latur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.