लातूर मंबई रेल्वेचा एक डब्बा कमी होणार! मध्य रेल्वेची मनमानी : मराठवाडा जनता विकास पदिषदेची डब्बे वाढवण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2015 09:44 PM2015-09-03T21:44:39+5:302015-09-04T00:40:18+5:30
लातूर : लातूर जिल्ातील व परिसरातील नागरिकांना व्यापारतसेच विविध कामानिमित्या मुंबई, पुणे येथे ये जा करावी लागते़ त्यासाठी लातूरकरांना सतत संघर्ष करुन लातर मुंबई रेल्वेमिळवली़ सध्या लातूर मुंबई रेल्वेला १८ डब्बे असूनही नागरिकांना गाडीत जागा अपुरी पडत आहे़ त्यामुळे मराठवाडा जनता विकास परिषदेने दोन डब्बे वाढवण्याची मागणी केली आहे़ पण मध्य रेल्वेने दोन डब्बे वाढवण्यापेक्षा एक सर्व सामान्य प्रवाशाचा डब्बा शनिवारा पासून कमी केला जाणार आहे़ त्यामुळे मध्य रेल्वेच्या या मनमानी धोरणावर लातूर जिल्ातील व परिसरातील नारिकांनकडून संताप व्यक्त होत आहे़

लातूर मंुबई रेल्वे मुळे रेल्वे प्रशासनाला महिन्याला २ ते ३ कोटीचा महसुल मिळत आहे़ लातूर मुंबई रेल्वेमुळे व्यापार व दैनंदिन प्रवासासाठी उपयुक्त साधन म्हणून रेल्वेकडे नागरिक पहात आहेत़ गोर-गरिब नागरिकांना रेल्वेमुळे मुंबई-पुण्याला अगदी अल्प दराच्या प्रवास भाड्याचा लाभ मिळत आहे़ लातूर जिल्ासह बीड, उस्मानाबाद, नांदेड येथील नागरिकांची मोठ्या प्रमाणातयेथे गर्दी होत आहे़ मुंबई-लातूर रेल्वेच्या लोकप्रियतेमुळे गाडी येण्याआधिच प्रवाशी दोन-दोन तास लवकर येवून थांबत आहेत़ त्यामुळे दिवसेंदिवस प्रवासासाठी गर्दी होत आहे़ लातूर मुंबई रेल्वेला १८ डब्बे असून ही सर्वसामान्य प्रवाशांना जागा मिळत नसल्याने पूर्ण प्रवास उभा टाकून कराव लागत आहे़ याची दखल घेवून नागरिकाकडून तसेच मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने सर्वसामान्या प्रवाशाची सोय व्हावी म्हणून दोन डब्बे वाढवून २१ डब्बे करण्याची मागणी केली जात आहे़ पण मध्य रेल्वे प्रशासनाकडून याची दखल घेवून डब्बे वाढवण्यापेक्षा एक डब्बा शनिवार पासून कमी केला जात आहे़ या मध्यरेल्वेच्या मनमानी कारभाराबाबत लातूरजिल्ातील नागरिक तसेच परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्तकेला जात आहे़
मनमानी कारभारा़़़
मध्ये रेल्वेचा मनमानी कारभार सुरू आहे़ डब्बे वाढवण्याची मागणी असताना एक डब्बा कमी करण्यात येत आहे़ या निर्णयाच्या विरोधात तिव्र अंदोलन उभारण्यात येईल असशी माहिती मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष शिवाजीनरहरे यांनी सांगीतले़
शनिवार पासून एक डब्बा कमी ़़़
मध्य रेल्वेच्या मुंबई कार्यालयाने छत्रपती शिवाजी टर्मिनल्स येथे फ्लफॉर्म वरती काम सुरू असल्याने एक डब्बा कमी करण्याचे आदेश आहेत़ त्यामुळे शनिवार पासून एक डब्बा कमी केला जाणार आसल्याची माहिती मुखयवाणिज्य निरिक्षक सुनिल शिंदे यांनी दिली़
सत्ताधारीखासदारांच्या पत्राला केराची टोपली़़़
लातूर चे खा़डॉ सुनिल गायकवाड यांनी रेल्वेचे दोन डब्बे वाढवण्यात यावे यासाठी पाठपुरवा करण्यासाठी अनेक वेळा पत्र पाठवून पाठपुरावा केला़ केला असला तरी त्यांच्या डब्बे वाढवण्याचे पत्राला केराची टोपली दाखवली असून एक डब्बा कमी केला आहे़