लातूरच्या विद्यार्थ्याचा मृतदेह अमेरिकेत अंत्यसंस्काराविना, परराष्ट्र खात्याचा 'वीकेंड'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2017 08:24 PM2017-11-05T20:24:47+5:302017-11-05T20:25:13+5:30
टेकचंद सोनवणे
नवी दिल्ली - परराष्ट्र मंत्रालय व न्यूयॉर्क वाणिज्य दूतावासाच्या अनास्थेमुळे लातूरच्या सुनील बिराजदारचा मृतदेह 12 दिवसानंतरही अमेरिकेत अंत्यसंस्काराविना आहे. तो ओहियोतील विद्यापीठात अभियांत्रिकीचे पदव्युत्तर शिक्षण घेत होता. सुनील 27 ऑक्टोबरपासून बेपत्ता होता. तलावाजवळ त्याचा मृतदेह सापडल्याची माहिती 1 नोव्हेंबरला विद्यापीठाने त्याच्या नातेवाईकांना दिली.
सुनीलचा मित्र रविशंकर याने परराष्ट्र मंत्रालय, न्यूयॉर्क वाणिज्य दूतावासाच्या अनास्थेमुळे लातूरच्या सुनील बिराजदारचा मृतदेह 12 दिवसानंतरही अमेरिकेत अंत्यसंस्काराविना आहे. तो ओहियोतील विद्यापी मध्ये संपर्क साधला. सुषमा स्वराज यांना ट्वीट केले. मृतदेह भारतात पाठविण्याचे आश्वासन दिल्यानंतर वाणिज्य दूतावासाने तांत्रिक कारण सांगत नंतर नकार कळवला.
दहा दिवसांपासून सुनीलचे कुटुंबिय परराष्ट्र मंत्रालय, वाणिज्य दूतावासाच्या संपर्कात आहे. मृतदेह मायदेशी आणण्याऐवजी तेथेच अंत्यसंस्कार करू देण्यास कुटुंबीयांनी होकार कळवल्यानंतर 'विकेंड' चे कारण सांगत अधिकाऱ्यानी अंत्यसंस्कारास पुन्हा विलंब केला. आजही सुनीलचा मृतदेह अंत्यसंस्काराविनाच आहे. मूळ उदगीरचा असलेल्या सुनीलने पुण्याच्या सिंहगड इन्स्टिट्यूटमधून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले होते. त्याच्या संशयास्पद मृत्यूमागे घातपाताची शक्यता कुटुंबीयांनी वर्तवली होती. त्याच्या मृत्यूची माहिती दिल्यावर वाणिज्य दूतावास, परराष्ट्र मंत्रालयाने केवळ ई-मेल्सचे घोडे नाचवले. सुनीलचे नातेवाईक रविशंकर शीवशिवे म्हणाले की, परराष्ट्र मंत्रालय, वाणिज्य दूतावास यांनी मेल्सना उत्तर दिले; परंतु अंत्यसंस्कारासाठी तत्परता दाखवली नाही. सुनीलचा मृतदेह त्यामुळेच अंत्यसंस्काराविना आहे.