राज्यनाट्य स्पर्धेत लातूरचे ‘मुक्ती’ प्रथम प्राथमिक फेरीचे निकाल : ‘कुडरूवाडीचे डॉक्टर तुम्हीसुद्धा?’ द्वितीय
By admin | Published: December 8, 2015 01:52 AM2015-12-08T01:52:29+5:302015-12-08T01:52:29+5:30
सोलापूर : पंचावन्नाव्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या सोलापूर केंद्रावर झालेल्या प्राथमिक फेरीत लातूरच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शाखेने सादर केलेल्या मुक्ती या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. कुडरूवाडी युवक बिरादरीचे ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा?’ द्वितीय; तर सोलापूरच्या र्शुती मंदिरच्या ‘ऑनलाईन’ नाटकाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे.
Next
स लापूर : पंचावन्नाव्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या सोलापूर केंद्रावर झालेल्या प्राथमिक फेरीत लातूरच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शाखेने सादर केलेल्या मुक्ती या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. कुडरूवाडी युवक बिरादरीचे ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा?’ द्वितीय; तर सोलापूरच्या र्शुती मंदिरच्या ‘ऑनलाईन’ नाटकाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे.हुतात्मा स्मृती मंदिरात 19 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरदरम्यान या स्पर्धेची प्राथमिक फेरी झाली. यामध्ये अकरा नाटके सादर झाली होती. स्पर्धेत सर्वांत अखेरीस 5 डिसेंबर रोजी लातूरचे मुक्ती हे नाटक सादर झाले. याच नाटकाने प्रथम पारितोषिक मिळविले आहे. याशिवाय या नाटकाला पाच वैयक्तिक पारितोषिके मिळाली आहेत. यामध्ये दिग्दर्शन, प्रकाशयोजना, रंगभूषा आणि स्त्री व पुरुष अभिनयाची रौप्यपदके ‘मुक्ती’च्या कलावंतांनी पटकावली आहेत.या स्पर्धेत परीक्षक म्हणून दीप चहांदे, मनोहर धोत्रे आणि निरंतर केशव यांनी काम पाहिले. प्रा. ममता बोल्ली यांच्यावर समन्वयकपदाची जबाबदारी होती. पुरस्कार विजेत्या कलावंतांचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी अभिनंदन केले आहे.इन्फो बॉक्स.......1) सविस्तर निकाल असा,दिग्दर्शन प्रथम - शैलेश गोजमगुंडे (मुक्ती)दिग्दर्शन द्वितीय - दिनेश कदम (डॉक्टर तुम्हीसुद्धा?)प्रकाशयोजना प्रथम - सुधीर राजहंस (मुक्ती)प्रकाशयोजना द्वितीय - दीपक कसबे (ऑनलाईन)नेपथ्य प्रथम - बाळ निमसूडकर (डॉक्टर तुम्हीसुद्धा?)नेपथ्य द्वितीय - लक्ष्मण वासमोडे (मुक्ती)रंगभूषा प्रथम - स्मिता उपाध्ये (मुक्ती)रंगभूषा द्वितीय - भगवान बागल (डॉक्टर तुम्हीसुद्धा?)2) अभिनय पारितोषिकेअभिनय रौप्यपदक (पुरुष) - संतोष साळुंके (मुक्ती)अभिनय रौप्यपदक (स्त्री ) - वैभवी सबनीस (मुक्ती)गुणवत्ता प्रमाणपत्रे - सीमा चांदेकर (डॉक्टर..)अश्विनी बडगे (?ातला विनोद..)प्रियंका सिसासवद (मोरुची मावशी)संतोष सुर्वे (डॉक्टर..)ऋतुराज आरसीद (ऑनलाईन)अरविंद अंदोरे (मोरुची मावशी)विकास सुरवसे (ब्लाईंड चेस)