लंडनमध्ये स्मारकाचे लोकार्पण

By Admin | Published: November 15, 2015 03:06 AM2015-11-15T03:06:31+5:302015-11-15T03:06:31+5:30

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या निवासस्थानाच्या माध्यमातून समता आणि सामाजिक न्यायाचा संदेश जगाला कायम प्रेरणा देत राहील, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या.

Launch of monument in London | लंडनमध्ये स्मारकाचे लोकार्पण

लंडनमध्ये स्मारकाचे लोकार्पण

googlenewsNext

लंडन : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या निवासस्थानाच्या माध्यमातून समता आणि सामाजिक न्यायाचा संदेश जगाला कायम प्रेरणा देत राहील, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या. डॉ. आंबेडकर यांनी वास्तव्य केलेले लंडनमधील किंग हेन्री मार्गावरील निवासस्थान शनिवारी मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या उपस्थितीत सामान्य जनतेसाठी
खुले करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.
या छोटेखानी कार्यक्रमाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, खासदार रामदास आठवले, माजी मंत्री सुलेखा कुंभारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी या निवासस्थानाला भेट दिली आणि त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली दुर्मीळ छायाचित्रे आणि अन्य संस्मरणीय वस्तूंची माहिती घेतली. त्यानंतर पंतप्रधान
आणि मुख्यमंत्री यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भावपूर्ण अभिवादन केले.
पंतप्रधान मुंबईत इंदू मिल स्मारकाच्या भूमिपूजनासाठी आले असताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना या निवासस्थानाला भेट देण्याची विनंती केली होती. पंतप्रधानांनी
हे निमंत्रण स्वीकारत आपल्या लंडनच्या
दौऱ्यादरम्यान या कार्यक्रमाचा समावेश
केला. (वृत्तसंस्था)
‘जय भीम’चा जयघोष
या ऐतिहासिक वास्तूतील दुर्मीळ छायचित्रे आणि संस्मरणीय वस्तूंची पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. त्यानंतर बाहेर हजारोंच्या संख्येने जमलेल्या नागरिकांना हात उंचावून अभिवादन केले. या वेळी उपस्थितांनी जय भीम आणि
डॉ. बाबसाहेब आंबेडकरांच्या जयजयकाराचा जयघोष करून परिसर दणाणून टाकला.
हा ऐतिहासिक दिवस - देवेंद्र फडणवीस
हा एक ऐतिहासिक दिवस! भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेले घर, जेथे राहून त्यांनी लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतले, ते घर आज पंतप्रधानांच्या हस्ते स्मारक रूपाने जनतेकरिता खुले झाले आहे. समता आणि बंधुता या आधारावर समाज आणि देश प्रगती करू शकतो, हे आपल्या संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी अधोरेखित केले आहे. भारतमातेच्या या सुपुत्राला माझी वंदना. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र!

Web Title: Launch of monument in London

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.