पाईपलाईन जोडणीच्या कामाचा शुभारंभ

By Admin | Published: April 18, 2016 12:46 AM2016-04-18T00:46:49+5:302016-04-18T00:54:55+5:30

लातूर : मिरजहून लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा केला जात आहे़ गेल्या ६ दिवसांपासून १० वॅगनची एक जलपरी दररोज ५ लाख लिटर पाणी घेऊन येत आहे़

Launch of Pipeline Connection Work | पाईपलाईन जोडणीच्या कामाचा शुभारंभ

पाईपलाईन जोडणीच्या कामाचा शुभारंभ

googlenewsNext


लातूर : मिरजहून लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा केला जात आहे़ गेल्या ६ दिवसांपासून १० वॅगनची एक जलपरी दररोज ५ लाख लिटर पाणी घेऊन येत आहे़ ५० वॅगन एका खेपेत आणण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाचे आहे़ मात्र पाणी उतरवून घेण्याची क्षमता नसल्याने सद्य स्थितीत १० वॅगन एका खेपेत आणल्या जात आहेत़
५० वॅगनमधील पाणी उतरवून घेण्यासाठी पाईपलाईन व पंप बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु झाले आहे़ रेल्वे स्थानकालगत असलेल्या विहिरीपासून आर्वी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाईपलाईन करण्यात येत असून, रविवारी या पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याहस्ते करण्यात आले़ २ किमी अंतरापर्यंतचे खोदकाम पुर्ण झाले असून, प्रति ५़५० मीटरचे ३४ पाईप बुजविण्यात आले आहेत़ शिवाय, विहिरीवर विद्युतपंप बसविण्याचे कामही सुरु झाले आहे़ सोमवारपर्यंत १२ पंप विहिरीवर बसविले जाणार आहेत़
प्रगती कन्सट्रक्शन मार्फत पाईपलाईनचे काम करण्यात येत असून, शासनाकडून पाईपचा पुरवठा झाला नव्हता़ त्यामुळे केवळ खोदकाम सुरु होते़ शनिवारी रात्री पाईपचा पुरवठा झाला आहे़ गुजरात राज्यातून पाईप आले आहेत़ प्रति ५़५० मीटरचे ३४ पाईपचा पुरवठा झाला असून, ते बसविण्यातही आले आहेत़ अन्य पाईप रविवारी रात्रीपर्यंत प्राप्त होणार आहेत़ त्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसांत पाईपलाईनचे काम पुर्ण होईल असे प्रगती कन्सट्रक्शनचे संचालक गोविंदराव माकणे यांनी सांगितले़ रविवारी सकाळी ९ वाजता मिरजेहून जलपरीची सहावी खेप झाली़ १० वॅगनमधील ५ लाख लिटर पाणी ४४ मिनीटांत उतरवून घेण्यात आले़ त्यानंतर विहिरीतून टँकरद्वारे आर्वी येथील जलशुद्धीकरण केंद्रात टाकण्यात आले़ पाईपलाईन पुर्ण झाल्यानंतर ५० वॅगनची जलपरी येणार आहे़ हे पाणी उतरवून घेण्यासाठी विहिरीवर १२ पंप बसवून या पंपाद्वारे जलशुद्धीकरण केंद्रात टाकले जाणार आहे़ त्यासाठी ही पाईपलाईन करण्यात येत आहे़ २ किलोमीटर अंतराचे खोदकाम पुर्ण झाले असून, रविवारी आलेले ३४ पाईपही बुजविण्यात आले आहेत़ पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी रेल्वेतील पाणी उतरविणे, साठविणे आणि टँकरद्वारे त्याची वाहतूक करण्याच्या कामाची पाहणी केली़

Web Title: Launch of Pipeline Connection Work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.