'योगींची कायदा सुव्यवस्था निकामी'; हत्येनंतर एमआयएम अन् सपा नेत्यांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 12:08 AM2023-04-16T00:08:12+5:302023-04-16T00:10:29+5:30

झांसीत ज्या दिवशी असदच्या एन्काऊंटरची घटना घडली, त्यादिवशी  माफिया अतिक अहमदला प्रयागराज कोर्टात हजर करण्यात आले होते

Law and order failure of yogis; Anger of MIM asaduddin owaisee and SP leaders akhilesh yadav after the murder | 'योगींची कायदा सुव्यवस्था निकामी'; हत्येनंतर एमआयएम अन् सपा नेत्यांचा संताप

'योगींची कायदा सुव्यवस्था निकामी'; हत्येनंतर एमआयएम अन् सपा नेत्यांचा संताप

googlenewsNext

प्रयागराज - उत्तर प्रदेशमध्ये दोन दिवसांपूर्वी उमेश पाल हत्याप्रकरणातील आरोपींचा एन्काऊटर करण्यात आला होता. अतिक अहमदचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलाम हे दोघेही पोलीस चकमकीत ठार झाले होते. त्यानंतर, आता या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांची हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मीडियाला बाईट देत असतानाच या दोघांवर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यामुळे, या हत्येचा व्हिडिओ लाईव्ह रेकॉर्ड झाला असून तो व्हिडिओ व्हायरल होत आहे. या घटनेवरुन सोशल मीडियावर ट्रेंड सुरू आहे. मात्र, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि एमआयएमचे नेते असुदुद्दीन औवेसी यांनी संताप व्यक्त केला आहे.  
 
झांसीत ज्या दिवशी असदच्या एन्काऊंटरची घटना घडली, त्यादिवशी  माफिया अतिक अहमदला प्रयागराज कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच अतिक कोर्टातच ढसाढसा रडला. विशेष म्हणजे आज मुलाच्या दफनविधीसाठीही त्याला नेले नव्हते. आज प्रयागराज येथील रुग्णालयात नेत असताना अतिक आणि अश्रफ यांच्यावर गोळीबार झाला. या घटनेचा थरार व्हिडिओत कैद झाला असून सोशल मीडियावर अतिक अहमद ट्रेंड सुरू झाला आहे. या ट्रेंडमध्ये या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियातून व्हायरल झाला आहे. एकीकडे या हत्येचं समर्थन होत असताना दुसरीकेड समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन औवेसी यांनी या घटनेवर तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. 

उत्तर प्रदेशात गुन्हेगारीने सीमा ओलांडली आहे. आरोपींचा जोश वाढत आहे. जर पोलिसांच्या घेरावमध्ये घुसून कोणाची तरी हत्या करण्यात येत असेल तर सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेचं काय?, असा प्रश्न अखिलेश यादव यांनी विचारला आहे. तसेच, या घटनांमुळे जनेतेमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून काही लोकं जाणीवपूर्वक असं वातावरण निर्माण करत असल्याचं वाटतं, असेही यादव यांनी म्हटले. 

अतिक आणि त्याचा भाऊ पोलिसांच्या ताब्यात होते, त्यांच्या हातात बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. यावेळी, जय श्रीरामचेही नारे देण्यात आले. या दोघांची हत्या योगी सरकारच्या कायदा व्यवस्थेचा नाकामीपणा आहे,  तर एन्काऊंटर जश्न साजरा करणारेही या हत्येस जबाबदार आहेत, असे म्हणत एमआयएम प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. 

असद आणि गुलावचा दफनविधी

दरम्यान, आजच असदच्या सुपूर्द ए-खाक ची रस्म पूर्ण करताना पोलिसांकडून ड्रोनने निगराणी करण्यात आली होती. सकाळी ९.३० वाजता झांसी येथून प्रयागराजला असद व गुलाम यांचे पार्थिव आणण्यात आले होते. त्यानंतर, असदचे शव थेट कसारी-मसारी कब्रस्तानमध्ये नेण्यात आले. तर, गुलामवर मेहदौरी कब्रस्तान येथे दफविधी करण्यात आला. दरम्यान, दोघांच्याही दफनविधीवेळी पल्बीक आणि मीडियाला दूरवरच उभे केले होते. केवळ, जवळच्या २५ नातेवाईकांना कब्रस्तानमध्ये प्रवेश देण्यात आला होता. मुलाच्या दफनविधीसाठीही अतिकला नेण्यात आलं नव्हतं. 

Web Title: Law and order failure of yogis; Anger of MIM asaduddin owaisee and SP leaders akhilesh yadav after the murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.