कायद्यामध्ये असला पाहिजे मानवतेचा स्पर्श, सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 10:02 AM2023-04-08T10:02:20+5:302023-04-08T10:23:53+5:30
गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या प्लॅटिनम ज्युबिली समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
गुवाहाटी : सर्व लोकांचे हित साधण्यासाठी कायद्यामध्ये मानवतेचा स्पर्श असला पाहिजे आणि समस्या मुळापासून नष्ट करण्यासाठी नेहमीच संवेदनशीलतेसोबत याचा वापर केला पाहिजे, असे मत सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी शुक्रवारी व्यक्त केले. गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या प्लॅटिनम ज्युबिली समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले की, कायद्याला त्या समुदायांची वास्तविकता लक्षात घेतली पाहिजे, ज्या समुदायांची अंमलबजावणी करायची आहे. जेव्हा कायद्याचा बुद्धिमतापूर्ण अर्थ लावला जातो आणि त्याची अंमलबजावणी केली जाते, तेव्हा लोकांचा सामाजिक रचनेवर विश्वास असतो आणि ते न्यायाच्या दिशेने एक पाऊल असते.
याचबरोबर, न्यायव्यवस्थेची वैधता लोकांच्या विश्वासावर असते, जी न्यायालयीन स्वातंत्र्यावर अवलंबून असते. लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास या सर्वात महत्त्वाच्या घटकांवरून निश्चित केला जातो की, समस्या आणि गरज असलेल्या नागरिकांसाठी न्यायव्यवस्था हा पहिला आणि शेवटचा उपाय आहे, असेही सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी सांगितले.
महिलांच्या सुरक्षेसाठी मोबाइल अॅप केले सुरू
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले की, कायदा आणि त्याचे प्रशासन न्यायाचा पराभव करत नाहीत, तर तो टिकवून ठेवतात. हे सुनिश्चित करणे ही न्यायव्यवस्थेची भूमिका आहे. दरम्यान, यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी मोबाईल अॅप लाँच केले.
डीवाय चंद्रचूड यांच्याविषयी...
डीवाय चंद्रचूड यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1959 रोजी झाला. धनंजय यशवंत चंद्रचूड असे त्यांचे पूर्ण नाव आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी दिल्ली विद्यापीठातून एलएलबीचे (LLB) शिक्षण घेतले आहे. यानंतर त्यांनी प्रतिष्ठित इनलॅक्स (InLaks)स्कॉलरशिपच्या मदतीने हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेतले. हार्वर्डमध्ये, त्यांनी लॉ इन मास्टर्स (LLM) आणि फॉरेन्सिक सायन्स (SJD) मध्ये डॉक्टरेट पूर्ण केली. त्यांनी ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी, हार्वर्ड लॉ स्कूल, येल लॉ स्कूल आणि युनिव्हर्सिटी ऑफ द विटवॉटरसँड, दक्षिण आफ्रिकेत व्याख्यानेही दिली आहेत.