एलबीटी अनुदानापोटी साडेसहा कोटी मनपा: अनुदान प्राप्त

By admin | Published: June 5, 2016 06:56 PM2016-06-05T18:56:11+5:302016-06-05T18:56:11+5:30

जळगाव : स्थानिक संस्था करातील (एलबीटी) तूट भरून काढण्यासाठी महापालिकांना देण्यात येणार्‍या अनुदानाचे ६ कोटी ६५ लाख महापालिकेस शासनाकडून प्राप्त झाले आहे.

LBT grant upto Rs. 12 crores Municipal Corporation: Grants received | एलबीटी अनुदानापोटी साडेसहा कोटी मनपा: अनुदान प्राप्त

एलबीटी अनुदानापोटी साडेसहा कोटी मनपा: अनुदान प्राप्त

Next
गाव : स्थानिक संस्था करातील (एलबीटी) तूट भरून काढण्यासाठी महापालिकांना देण्यात येणार्‍या अनुदानाचे ६ कोटी ६५ लाख महापालिकेस शासनाकडून प्राप्त झाले आहे.
शासनाने ऑगस्ट २०१५ पासून ५० कोटींपेक्षा कमी आर्थिक उलाढाल असलेल्या सर्व व्यापार्‍यांना स्थानिक संस्था करात सुट दिली आहे. त्यानुसार माहे जूनचे अनुदान वितरीत करण्यात येत असल्याचे आदेश ४ जून रोजी शासनाकडून काढण्यात आले.
महापालिकेस मदत
महापालिकेची आर्थिक स्थिती गेल्या काही वर्षात अतिशय नाजूक झाली आहे. त्यातच एलबीटी बंद केल्याने मनपाच्या अडचणीत अधिकच वाढ झाली होती. मात्र एलबीटी अनुदान नियमित मिळू लागल्याने कर्मचार्‍यांचे पगार व अन्य देणी काहीशी सोपी झाली आहे.
जून महिन्याचे ६ कोटी ६५ लाखाचे अनुदान महापालिकेस मंजूर झाले असून त्या संदर्भातील आदेशही प्राप्त झाले आहेत.

Web Title: LBT grant upto Rs. 12 crores Municipal Corporation: Grants received

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.