'पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा दिल्यास शीर उडवू - भाजपा नेते दिलीप घोष यांचे वादग्रस्त विधान

By admin | Published: March 4, 2016 09:28 AM2016-03-04T09:28:46+5:302016-03-04T09:30:56+5:30

पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणा-याचे शीर उडवण्यात येईल' असा धमकीवजा इशारा भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी दिला.

Leader of the Opposition Dilip Ghosh's controversial statement | 'पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा दिल्यास शीर उडवू - भाजपा नेते दिलीप घोष यांचे वादग्रस्त विधान

'पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा दिल्यास शीर उडवू - भाजपा नेते दिलीप घोष यांचे वादग्रस्त विधान

Next

ऑनलाइन लोकमत

कोलकाता, दि. ४ - सध्या सुरू असलेल्या वादग्रस्त विधानांच्या काळात पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यानेही भर टाकली आहे. ' पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणा-याचे शीर उडवण्यात येईल' असा धमकीवजा इशारा भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी दिला. बुधवारी बीरभूम येथे पक्ष कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीदरम्यान त्यांनी हे विधान केल्याचे समजते. 
' नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारची पाकिस्तान व बांग्लादेशविरोधातील भूमिका कठोर आहे. आता दिवस बदलले आहेत, आम्ही अशा गोष्टी बिलकूल खपवून घेणार नाही. जर कोणीही पाकिस्तान जिंदाबाद वा देशविरोधी घोषणा दिल्यास त्यांना वरून ६ इंच कापण्यात येईल. जे कोणीही राष्ट्रविरोधी घोषणा देतील त्यांनी कठोर शिक्षा करण्यात येईल' असे घोष यांनी स्पष्ट केले. 
दरम्यान या आठवड्यातच भाजपाच्या आणखी दोन नेत्यांवर आक्षेपार्ह व वादग्रस्त विधाने केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री रामशंकर कथेरिया यांनी आग्रा येथील शोकसभेत आक्षेपार्ह जातीय वक्तव्य केले होते, त्यावरून गदारोळही निर्माण झाला होता. तसेच भाजपाचे आणखी एक नेते बाबूलाल यांनीही आक्षेपार्ह वक्तव्य केले होते, त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती.

Web Title: Leader of the Opposition Dilip Ghosh's controversial statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.