शेतकर्‍यांचा नेता हरपला शेतकरी संघटनांच्या प्रतिक्रिया : असा नेता होणे नाही

By admin | Published: December 12, 2015 06:34 PM2015-12-12T18:34:26+5:302015-12-12T18:34:26+5:30

जळगाव- शेतकरी हा दुर्लक्षित घटक आहे. पण शरद जोशी अगदी चोपडा, रावेरपर्यंत शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी आले. त्यांचे शेती व शेतकर्‍यांसाठी केलेले कार्य सर्वच क्षेत्रातील मंडळीसाठी प्रेरणादायी आहे, अशा प्रतिक्रिया शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधी, सदस्यांनी दिल्या आहेत.

The Leader of the Peasants' Response to the Herbal Farmer's Organization: This does not have to be such a leader | शेतकर्‍यांचा नेता हरपला शेतकरी संघटनांच्या प्रतिक्रिया : असा नेता होणे नाही

शेतकर्‍यांचा नेता हरपला शेतकरी संघटनांच्या प्रतिक्रिया : असा नेता होणे नाही

Next
गाव- शेतकरी हा दुर्लक्षित घटक आहे. पण शरद जोशी अगदी चोपडा, रावेरपर्यंत शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी आले. त्यांचे शेती व शेतकर्‍यांसाठी केलेले कार्य सर्वच क्षेत्रातील मंडळीसाठी प्रेरणादायी आहे, अशा प्रतिक्रिया शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधी, सदस्यांनी दिल्या आहेत.

विटनेरचा गौरव
शरद जोशी एकदा विटनेर येथे आले होते. त्यांची सभा गावातच एका टेकड्यावर व्यासपीठ करून झाली होती. या व्यासपीठाचे व ग्रामस्थांच्या प्रचंड उपस्थितीबाबत जोशी यांनी कौतुक केले होते. त्यांच्यासोबत अनेक वर्षे काम केले. राजकारणाचे अनेक धडे मी त्यांच्याकडून घेतले.
-इंदिराताई पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष, शेतकरी संघटना महिला आघाडी

तशी भूमिका कुणी घेत नाही
माझा संघटनेतील कामाचा अनुभव कमी असला तरी मी अनेकदा शरद जोशी यांचे लेख वाचले, त्यांची भाषणे ऐकली. त्यांच्या शेतीच्या प्रश्नांबाबतच्या भूमिकेचे कौतुक करायला हवे. ते जी भूमिका घ्यायचे त्यावर ठाम असायचे. शेतकर्‍यांना त्यांनी एकसंध केले होते.
-ॲड.हर्षल चौधरी, सरचिटणीस, स्वाभिमानी शेतकरी संघटना

दुष्काळासारखे संकट
शरद जोशी यांचे निधन म्हणजे दुष्काळानंतर आलेल्या समस्यांसारखे आहे. दुष्काळाचा सामना शेतकरी करीत असतानाच एक सच्चा शेतकरी नेता आपल्यातून निघून गेल्याचे दु:ख आहे. त्यांचे संघटन कौशल्य शिकण्यासारखे आहे.
-कडूअप्पा पाटील, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना

नोकरी सोडून शेती
शरद जोशी यांनी उच्च शिक्षण घेऊन चांगली नोकरी करायला सुरुवात केली. परंतु केवळ शेतकर्‍यांसाठी त्यांनी नोकरी सोडली व ते शेतीत, मातीत रमले. त्यांचे विचार नेहमीच आपल्यात राहतील. त्यांच्या मागण्या, भूमिकेबाबत सरकारने सकारात्मक राहावे.
-अजय बसेर, जिल्हा युवा अध्यक्ष, शेतकरी संघटना

Web Title: The Leader of the Peasants' Response to the Herbal Farmer's Organization: This does not have to be such a leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.