त्या नेत्याला संघाने दाखवली बाहेरची वाट

By Admin | Published: March 3, 2017 08:52 PM2017-03-03T20:52:35+5:302017-03-03T20:52:35+5:30

केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांचा शिरच्छेद करणाऱ्यास एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा करून वादाला तोंड फोडणारे कुंदर चंद्रावत यांना

The leader showed the leader the exit | त्या नेत्याला संघाने दाखवली बाहेरची वाट

त्या नेत्याला संघाने दाखवली बाहेरची वाट

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
उज्जैन, दि. 3 - केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांचा शिरच्छेद करणाऱ्यास एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा करून वादाला तोंड फोडणारे कुंदर चंद्रावत यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कार्यमुक्त करत बाहेरची वाट दाखवली आहे. तसेच चंद्रावत यांचे मत ही संघाची अधिकृत भूमिका नसून संघ अशा हिंसेविरोधात असल्याचेही संघाकडून पुन्हा स्पष्ट करण्यात आले आहे. 

गुरुवारी चंद्रावत यांच्या विधानावरून राजकीय वादळ उठले होते. त्या विधानावरून संघावरही चौफेर टीका झाली त्यानंतर संघाने ही आपली भूमिका नसल्याचे सांगून या वादातून अंग काढून घेतले होते. तसेच चंद्रावत यांनीही आपल्या आक्षेपार्ह विधानाबाबत खेद व्यक्त केला होता. दरम्यान, संघाने आज उज्जैन महानगर येथील संघ प्रचार प्रमुख असलेल्या चंद्रावत यांच्यावर कारवाई करत त्यांना कार्यमुक्त केले.  
चंद्रावत यांच्या भाषणाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता. त्यात केरळमधील डावे नेते आणि कार्यकर्त्यांवर चंद्रावत यांनी हिंसक भाषेत टीका केली होती. अशा गद्दारांना देशात राहण्याचा अधिकार नाही. त्यांना लोकशाहीची हत्या करण्याचा अधिकार नाही, गोध्रा येथे 56 जणांना मारल्यावर त्यांचे 2000 जण मृत्युमुखी पडले होते, हे ते विसरले काय? डाव्यानो ऐका 300 प्रचारक आणि कार्यकर्त्यांची हत्या केली आहे ना तुम्ही, आता 3 लाख जणांच्या शिरांची माळ भारतमातेस घालू, असे चंद्रावत म्हणाले होते.  या भाषणानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. 

Web Title: The leader showed the leader the exit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.