काश्मीरमधील ‘लष्कर’चे वरिष्ठ नेतृत्व नेस्तनाबूत, लवकरच शांतता नांदण्याची खात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 06:19 AM2017-11-20T06:19:41+5:302017-11-20T06:19:59+5:30

श्रीनगर : उत्तर काश्मीरच्या बंदीपोरा जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत सहा अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आल्याने काश्मीर खो-यात सक्रिय असलेले लष्कर-ए-तैयबाचे वरिष्ठ नेतृत्व संपुष्टात आले आहे, असा दावा भारतीय सैन्याने रविवारी केला.

Leaders of LeT's leadership in Kashmir are destroyed, soon there is peace | काश्मीरमधील ‘लष्कर’चे वरिष्ठ नेतृत्व नेस्तनाबूत, लवकरच शांतता नांदण्याची खात्री

काश्मीरमधील ‘लष्कर’चे वरिष्ठ नेतृत्व नेस्तनाबूत, लवकरच शांतता नांदण्याची खात्री

Next


श्रीनगर : उत्तर काश्मीरच्या बंदीपोरा जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत सहा अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आल्याने काश्मीर खो-यात सक्रिय असलेले लष्कर-ए-तैयबाचे वरिष्ठ नेतृत्व संपुष्टात आले आहे, असा दावा भारतीय सैन्याने रविवारी केला.
काश्मीरमधील भारतीय लष्कराच्या कारवाईची जबाबदारी असलेल्या १५ व्या कॉर्पस््चे ध्वजाधिकारी लेफ्ट. जनरल जे. एस. संधू यांनी सांगितले की, गेले काही महिने सैन्याने सीमेपलीकडून होणाºया घुसखोरीविरुद्ध सातत्याने कारवाई केल्याने काश्मीरमधील परिस्थिती लक्षणीय सुधारली आहे. शनिवारी हाजिन भागात झालेल्या चकमकीत ठार झालेल्यांमध्ये ओवैद, झरगार आणि मेहमूद या लष्कर-ए-तैयबाच्या तीन प्रमुख म्होरक्यांचा समावेश असून या कारवाईमुळे ‘लष्कर’चे नेतृत्व संपुष्टात आले आहे. (वृत्तसंस्था)
>यंदा १९० अतिरेक्यांना टिपले
जनरल संधू यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा आतापर्यंत लष्कराने काश्मीरमध्ये १९० अतिरेक्यांचा खात्मा केला. त्यापैकी ११० सीमेपलीकडून आलेले होते, तर ८० स्थानिक होते. ठार केलेल्या ११० पैकी ६६ अतिरेक्यांना सीमा ओलांडताना टिपले गेले.
काश्मीरच्या अंतर्गत भागात १२५ ते १३० अतिरेकी मारले गेले. यावरून सीमा ओलांडताना जसे अतिरेकी मारले जात आहेत तसेच आधीपासून येऊन राज्याच्या अंतर्गत भागांत गेलेल्यांनाही टिपले जात आहे, हे यावरून दिसते, असे ते म्हणाले.
दहशतवादाकडे वळलेल्या अनेक तरुणांना त्या वाटेवरून परत आणण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. अनेकांची तशी इच्छा असते पण त्यासाठी नेमके काय करावे हे त्यांना कळत नाही. त्यांच्यासाठी पोलिसांनी हेल्पलाइन सुरू केली आहे.शुक्रवारी श्रीनगरजवळ झाकुरा येथे झालेला हल्ला ‘इसिस’ने केल्याचा दावा या दहशतवादी संघटनेच्या
‘अ‍ॅमॅक’ वृत्तसंस्थेने केला होता.
जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस.पी. वैद यांनी मात्र याचा इन्कार केला.

Web Title: Leaders of LeT's leadership in Kashmir are destroyed, soon there is peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.