ओवेसी सारख्या नेत्यांची तोंडं बंद करायला हवीत; असदुद्दीन यांच्या 'त्या' वक्तव्यावरून माधवी लता यांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 01:02 PM2024-04-25T13:02:46+5:302024-04-25T13:03:36+5:30
असुदद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात केलेल्या विधानावरून माधवी लता यांनी ओवेसींवर निशाणा साधला.
अकबरुद्दीन आणि असुदुद्दीन ओवेसी यांसारख्या नेत्यांची तोंडं बंद करायला हवीत, कारण ते सर्वसामान्यांमध्ये विष पेरण्याचे काम करत आहेत, अशा शब्दांत माधवी लता यांनी AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावर हल्ला चढवला आहे. त्या हैदराबादमधून भाजपच्या उमेदवार आहेत.
हैदराबाद लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आल्या असता, असुदद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात केलेल्या विधानावरून माधवी लता यांनी ओवेसींवर निशाणा साधला. माधवी म्हणाल्या, पंतप्रधानांच्या कोणत्या योजनेवर हिंदू मुस्लीम लिहिले आहे. अकबरुद्दीन आणि असदुद्दीन ओवेसी सारख्या त्यांच्यांची तोंडं बंद करायला हवीत. हे समाजात द्वेष पसरवण्याचे काम करत आहेत."
काय म्हणाले होते मोदी -
बिहारमधील किसनगंज येथे बोलताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले होते, "पंतप्रधान मोदींची एकमेव गॅरंटी आहे मुस्लिमांविरुद्ध द्वेषाची गॅरंटी. 2002 पासून ते मुस्लिमांचा द्वेष करत आहेत. देशात 17 कोटी मुस्लिम लोकसंख्या आहे, ते सर्वांचे पंतप्रधान आहेत, उद्या दंगल झाली तर त्याला मोदी जबाबदार असतील. एवढेच नाही तर, 'कुठे गेला, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, निवडणूक संपल्यानंतर द्वेष वाढेल. ते हिटलरची भाषा बोलत आहे."
माधवी लता यांचं प्रत्युत्तर -
ओवेसींच्या या वक्तव्यावर बोलताना माधवी लतादीदी म्हणाल्या, "आम्ही जेवढ्या योजना आणल्या आहेत, त्यावर हिंदू-मुस्लीम कुठे लिहिले आहे. ते लोकांमध्ये विष पेरण्याचे काम करत आहेत. जेव्हा काँग्रेस म्हते, लोकांची मालमत्ता मुस्लिमांमध्ये वाटून देऊ, तेव्हा ते कुठे असतात? असुदुद्दीन ओवेसी 2004 पासून सातत्याने हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून विजयी होत आहेत. मात्र, यावेळी भाजपच्या माधवी लता निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने ही लढत अधिकच रंजक बनली आहे.