माझ्याकडून पैसे घेणारे नेते, अधिकाऱ्यांची नावे सांगतो, आयएमएचा मन्सूर खान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 04:13 AM2019-06-25T04:13:50+5:302019-06-25T04:14:13+5:30
मॉनिटोरी अॅडव्हायजर (आयएमए) ग्रुपचे संस्थापक संचालक मोहम्मद मन्सूर खान यांनी मला भारतात यायचे असून, माझ्याकडून पैसे घेऊन ते विदेशात पाठवणारे राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांची आणि माझ्या व्यवसायाला बुडवणा-यांची नावे सांगायची माझी तयारी आहे
बंगळुरू : मॉनिटोरी अॅडव्हायजर (आयएमए) ग्रुपचे संस्थापक संचालक मोहम्मद मन्सूर खान यांनी मला भारतात यायचे असून, माझ्याकडून पैसे घेऊन ते विदेशात पाठवणारे राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांची आणि माझ्या व्यवसायाला बुडवणाºयांची नावे सांगायची माझी तयारी आहे, असे म्हटले.
खान यांचा १८ मिनिटांचा व्हिडिओ रविवारी आयएमएच्या यू-ट्यूब पेजवर त्यांचाच अधिकृत ई-मेल आयडी वापरून अपलोड करण्यात आला असून, त्यात त्यांनी वरील विधान केले आहे. खान यांच्या कंपनीचे दिवाळे निघाले. त्यानंतर ८ जून रोजी खान देशाबाहेर पळून गेले. खान यांनी मोठ्या परताव्याचे आश्वासन दिल्यावर आम्ही त्यांच्या आयएमए कंपनीत आमच्या कष्टाचा पैसा गुंतवला व आता आमची फसवणूक झाली अशा हजारो तक्रारी गुंतवणूकदारांनी त्यांच्या कंपनीविरुद्ध दाखल केल्या आहेत.
भारताबाहेर गेल्यावर पहिल्यांदा खान यांनी पहिल्या व्हिडिओत दावा केला की, १४ जून रोजी मी भारतात येण्यासाठी विमानात बसलो; परंतु कायदेशीर कारणांवरून मला उतरवण्यात आले व स्थलांतर अधिकाºयांशीसंपर्क साधण्यास सांगण्यात आले. खान यांनी ते नेमके कुठे आहेत, हे मात्र सांगितले नाही. केंद्रीय गुप्तचर खात्याकडून (सीबीआय) चौकशी केली जावी, अशी मागणी खान केली व त्यांची प्रतिमा मलिन करणाºया अनेक राजकीय नेत्यांची व बिल्डरांची नावेही घेतली. या नावांमध्ये अनेक जण हे त्यांच्या स्वत:च्या समाजाचेही आहेत.
मन्सूर खान यांनी आयएमएचे संचालक, राजकीय नेते व आयएएस अधिका-यांसह अनेक सरकारी अधिका-यांवर विश्वासघात केल्याचा आरोप करून आयएमए कोसळून पडण्यासाठी दोष दिला.
बंगळुरू शहराचे नवे पोलीस आयुक्त आलोक कुमार यांना मन्सूर खान यांनी मला भारतात परत येण्यासाठी मदत करण्याची व त्यासाठीच्या तिकिटाचे बुकिंग करण्यास मदत करावी, अशी विनंती व्हिडिओत केली आहे. (वृत्तसंस्था)