Encounter: उत्तर प्रदेश पोलीस एन्काउंटरमध्ये अग्रणी, महाराष्ट्रामध्ये आहे असं चित्र, गृहमंत्रालयाची आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 07:52 AM2022-04-07T07:52:45+5:302022-04-07T07:53:39+5:30
Encounter News: गेल्या सहा वर्षांत देशभरातील पोलीस एन्काउंटरमध्ये मृत्यू होण्यात उत्तर प्रदेश आणि छत्तीसगढ अग्रणी आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या विश्लेषणात्मक अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या सहा वर्षांत देशभरात घडलेल्या पोलीस एन्काउंटरमध्ये ८१३ जणांचा मृत्यू झाला.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : गेल्या सहा वर्षांत देशभरातील पोलीस एन्काउंटरमध्ये मृत्यू होण्यात उत्तर प्रदेश आणि छत्तीसगढ अग्रणी आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या विश्लेषणात्मक अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या सहा वर्षांत देशभरात घडलेल्या पोलीस एन्काउंटरमध्ये ८१३ जणांचा मृत्यू झाला. यापैकी ३५४ प्रकरणे प्रलंबित असून, ४५९ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. तथापि, ही प्रकरणे कशी निकाली काढण्यात आली, याचा काहीही थांगपत्ता देण्यात आलेला नाही.
छत्तीसगढमध्ये गेल्या सहा वर्षांत पोलीस एन्काउंटरमध्घे सर्वाधिक २५९ जणांचा मृत्यू झाला, तर उत्तर प्रदेशमध्ये १२१ जणांचा मृत्यू झाला. या अवधीत पश्चिम बंगालमध्ये पोलीस एन्काउंटरच्या पाच घटना घडल्या. पंजाबमध्ये या अवधीत ८ घटना घडल्या. एकेकाळी पोलीस एन्काउंटरसाठी पंजाब ओळखला जायचा. महाराष्ट्रात गेल्या सहा वर्षांत घडलेल्या पोलीस एन्काउंटरच्या घटनांत ३४ जणांचा मृत्यू झाला. तथापि, गेल्या तीन वर्षांत पोलीस एन्काउंटरच्या घटना कमी घडल्या आहेत. गेल्या सहा वर्षांत गोव्यातही पोलीस एन्काउंटरची एकही घटना घडली नाही. पोलीस एन्काउंटरच्या एकूण ८१३ घटनांपैकी ३५३ प्रकरणांत अद्याप कारवाई होणे बाकी आहे. पोलीस एन्काउंटरच्या ८१३ घटनांपैकी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने एकाच प्रकरणात शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस केली आहे, ही बाब विलक्षण असली, तरी खरी आहे.