वाघूर जलवाहिनीवर ६ ठिकाणी गळती मनपा : एका गळतीची महिना अखेरीस दुरूस्ती

By admin | Published: January 27, 2016 11:15 PM2016-01-27T23:15:45+5:302016-01-27T23:15:45+5:30

जळगाव : वाघूर पाणीपुरवठा योजनेच्या १२०० मिमी जलवाहिनीवर मेहरूणमधील लक्ष्मीनगर नाल्याजवळ लागलेल्या गळती दुरुस्तीसाठी तब्बल पाच दिवसांचा कालावधी लागल्यानंतरही या जलवाहिनीवर आणखी ६ ठिकाणी गळती कायम असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे महिनाअखेरीस आणखी एका गळतीची दुरुस्ती केली जाणार आहे.

Leakage at 6 places on Waghur water channel: Correction of a leak month at the end | वाघूर जलवाहिनीवर ६ ठिकाणी गळती मनपा : एका गळतीची महिना अखेरीस दुरूस्ती

वाघूर जलवाहिनीवर ६ ठिकाणी गळती मनपा : एका गळतीची महिना अखेरीस दुरूस्ती

Next
गाव : वाघूर पाणीपुरवठा योजनेच्या १२०० मिमी जलवाहिनीवर मेहरूणमधील लक्ष्मीनगर नाल्याजवळ लागलेल्या गळती दुरुस्तीसाठी तब्बल पाच दिवसांचा कालावधी लागल्यानंतरही या जलवाहिनीवर आणखी ६ ठिकाणी गळती कायम असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे महिनाअखेरीस आणखी एका गळतीची दुरुस्ती केली जाणार आहे.
मनपाच्या वाघूर जलवाहिनीला गळती लागण्याचे सत्र कायम आहे. मेहरूणमधील लक्ष्मीनगरातील नाल्याजवळील १२०० मीमी व्यासाच्या पीएससी पाईपलाईनला लागलेली गळती गेल्या अनेक दिवसांपासून होती. त्यातून पाण्याची नासाडी सुरू होती. अखेर हे काम २२ रोजी हाती घेण्यात आले. एक पाईप बदलण्यासाठी हे काम सुरू करण्यात आले. मात्र त्यानंतर आणखी दोन पाईप खराब असल्याचे आढळल्याने ते दुरुस्तीसाठी कालावधी वाढला. त्यातच पाईपचा धक्का लागल्याने आणखी एक पाईप फुटला. त्यामुळे धावपळ करून तोही बदलण्यात आला. मात्र या धावपळीत एका वेल्डींगला किंचीत गळती राहून गेल्याने या ठिकाणी देखील पुन्हा दुरुस्ती करावी लागणार आहे. या मुख्य जलवाहिनीवरील एका गळतीची दुरुस्ती महिनाअखेरीस केली जाणार असल्याचे समजते.
---- इन्फो---
या ठिकाणी गळती
१)मेहरूणमधील लक्ष्मीनगर हिरामण शेठ यांच्या हॉटेलजवळ.
२)पाणीपुरवठा युनिट कार्यालयाजवळ
३)हॉटेल कस्तुरीमागे.
४)नाथजोगी समाज दफनभूमीजवळ.
५)शिवाजी उद्यानातील नाल्याजवळ
६) गणपतीनगर मुख्य रस्त्यावर.

Web Title: Leakage at 6 places on Waghur water channel: Correction of a leak month at the end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.