'बाबा का ढाबा' वादातून 'या' 4 गोष्टी शिका, कलेक्टर साहेबांनी दिला ट्विटरवरुन धडा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 05:58 PM2021-06-15T17:58:46+5:302021-06-15T17:59:28+5:30
बाबांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात ते म्हणत आहेत, की ‘गौरव वासन… तो मुलगा काही चोर नव्हता, ना आम्ही कधी त्याला चोर म्हटले आहे.
नवी दिल्ली - गेल्या वर्षी 'बाबा का ढाबा' चागंलाच चर्चेचा विषय होता. आता पुन्हा तो चर्चेत आला आहे. 'बाबा का ढाबा' चलवणारे कांता प्रसाद आता पुन्हा आपल्या जुन्याच ढाब्यावर परतले आहेत. आता त्यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. यात ते यूट्यूबर गौरव वासनला माफी मागत आहेत. गेल्या वर्षी गौरवच्या व्हिडिओनंतरच 'बाबा का ढाबा' चर्चेत आला होता.
बाबांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात ते म्हणत आहेत, की ‘गौरव वासन… तो मुलगा काही चोर नव्हता, ना आम्ही कधी त्याला चोर म्हटले आहे. आमच्याकडून एक चूक झाली आहे, यासाठी आम्ही क्षमा मागतो आणि जनतेला म्हणत आहोत, की जर काही चूक असेल तर आम्हाला माफ करा.’ बाबांच्या या माफीच्या व्हिडिओनंतर गौरवनेही ऑल इज वेल म्हणत या व्हिडिओवर कमेंट दिली आहे. त्यामुळे, बाबा आणि गौरव वासन यांच्यातील वाद आता संपुष्टात आला आहे, असेच म्हणावे लागेल. मात्र, या दोघांच्या वादातून समाजाला अनेक धडे मिळाले आहेत. प्रत्येकजण आपल्या बुद्धीच्या कुवतेनुसार हे धडे घेत असतो.
‘बाबा का ढाबा’ प्रकरण से सीख:
— Awanish Sharan (@AwanishSharan) June 15, 2021
1. अचानक से हुई तरक़्क़ी स्थायी नहीं होती.
2. जिसने मुश्किल में आपका साथ दिया है, उसको दुखी मत करो.
3. संबंध ख़राब होने के बाद भी वापस आने की गुंजाइश होनी चाहिये.
4. सामने वाले की भूल को माफ़ करने से आपका क़द और बढ़ जाता है. #TuesdayFeeling
बाबा का ढाबा आणि ब्लॉगर गौरव यांच्या वादातून आपण खूप काही शिकलो, असे एका सनदी अधिकाऱ्याने म्हटलं आहे. अवनीश शरण असं या अधिकाऱ्याचं नाव असून त्यांनी ट्टिवरवरुन याबाबतची प्रतिक्रिया दिली आहे. बाबा का ढाबा या वादातून आपल्याला काय शिकायला मिळालं, असे म्हणत आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी 4 मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. यातून, या 4 गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील, असं ते म्हणाले.
1. तात्काळ झालेली प्रगती स्थीरस्थावर राहत नाही.
2. ज्यांनी कठीण काळात आपल्याला साथ दिली, त्यांना दु:खी करू नका.
3. एखाद्यासोबत संबंध बिघडल्यानंतरही, पुन्हा एकत्र येण्याची शक्यता असते.
4. समोरच्या व्यक्तीची चूक माफ केल्यास आपले महत्त्व अधिक वाढते, ना की कमी होते.