तुमच्या शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेसाठी जाणून घ्या 'हे' महत्त्वाचे नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 09:27 AM2017-09-25T09:27:25+5:302017-09-25T14:59:37+5:30

मुलांच्या शाळेतील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

Learn about the safety of your school children | तुमच्या शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेसाठी जाणून घ्या 'हे' महत्त्वाचे नियम

तुमच्या शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेसाठी जाणून घ्या 'हे' महत्त्वाचे नियम

Next
ठळक मुद्देगुरगावच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रद्युम्न ठाकूर या सात वर्षाच्या मुलाची हत्या झाली.द्युम्नच्या हत्येनंतर मुलांच्या शाळेतील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. रयाणाच्या पोलिसांनी तयार केलेले हे नियम महाराष्ट्रभरात असलेल्या शाळांसाठी उपयोगी पडणारे आहेत.

- अ.पां.देशपांडे 

मुंबई-  गुरगावच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रद्युम्न ठाकूर या सात वर्षाच्या मुलाची हत्या झाली. प्रद्युम्नच्या हत्येनंतर मुलांच्या शाळेतील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. मुलं शाळेत गेल्यावर किती सुरक्षित आहेत? असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जातो आहे. त्यावरून सुरू झालेल्या चर्चेच्या अनुरोधाने  हरयाणातील गुरगाव पोलिसांनी काही नियम केले आहेत. हरयाणाच्या पोलिसांनी तयार केलेले हे नियम महाराष्ट्रभरात असलेल्या शाळांसाठी उपयोगी पडणारे आहेत.

-  शाळेत प्रवेश करणाऱ्या व बाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ( विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, बस ड्रायव्हर्स, शाळा दुरुस्तीसाठी येणारी माणसे, पालक इत्यादी सर्व) नोंद दारावर करणे. ही नोंद एका रजिस्टरवर हाताने करावी अथवा इलेक्ट्रोनिकली करावी. विद्यार्थी-शिक्षक-अभ्यागत धरून सर्वांना गळ्यात अडकवण्याचे बिल्ले द्यावेत. संध्याकाळी अभ्यागतांचे बिल्ले गोळा करून हिशेब करावा.

- शाळेत प्रवेश करण्यासाठी एकच प्रवेशद्वार ठेवावे. इतर दरवाजे बंद करावेत. जर प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठी असेल तर प्रत्येक प्रवेशद्वारावर नोंदणी करायची सोय करायला हवी. 

- शाळेच्या कुंपणाची भिंत पुरेशी उंच असावी, जेणेकरून त्यावरून सहजी कोणी उडी मारून आत येऊ शकणार नाही.

- बस पार्किंग, कॅन्टिन, व्यायामशाळा, तरणतलाव, क्रीडांगणे इत्यादी ठिकाणी प्रवेशयोग्य व्यक्तीन्नाच जाऊ द्यावे. या ठिकाणी प्रशिक्षित शिक्षक हजर हवेत.

- वर्ग चालू असताना विद्यार्थी वर्गाबाहेर असणार नाहीत याची जबाबदारी शिक्षकांनी घ्यायला हवी.यावेळी भेट देणाऱ्या पालकांना फक्त कार्यालयात जाण्याची मुभा असावी.

- संस्थेचा कोपरानकोपरा सीसीटीव्हीच्या नजरेत असेल अशी सोय करायला हवी .यातून स्वच्छतागृहे वगळावीत का यावर स्वतंत्रपणे त्या त्या शाळेत चर्चा व्हावी.शाळेत प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांचे क्रमांक सीसीटीव्हीत नीट नोंदले जातील अशी व्यवस्था करायला हवी. सीसीटीव्हीतील दृष्य ३-४ ठिकाणी दिसतील अशी सोय केलेली असावी.

- शाळेच्या बसमध्ये सीसीटीव्ही आणि जीपीएस हवेत. बस ड्रायव्हर्स सुरक्षितपणे बस चालवतात का, रहदारीचे सगळे नियम पाळतात का, बसमध्ये अग्नी प्रतिबंधक नळकांडे आहे ना, प्रथमोपचाराची पेटी आहे

-  बसमध्ये प्रथम चढणारी आणि शेवटी उतरणारी मुलगी नाही ना, शक्यतो बसमध्ये महिला कंडक्टर ठेवता आल्यास पहावे, दुस-या इयत्तेखालची मुले बसमध्ये चढताना आणि उतरताना नीट लक्ष दिले जाते ना, बस स्टोप रस्त्याच्या कडेला आहे ना, दुसरीखालची मुले पालकांच्या ताब्यातच दिली जातात ना हे सगळे नीट पाहिले जायला हवे. बसमधून शाळेत आलेली सगळी मुले उतरली का हे 

- सुरक्षा अधिका-याने नीट तपासून मग बस पार्किंगला जाऊ द्यावी. बसचा दरवाजा नीट लागतो ना हे नीट तपासून पाहावे. आणि तरीही बसच्या दरवाजासमोर कोणालाही बसू अथवा उभे राहू देऊ नये.बसच्या काचा रंगवलेल्या असू नयेत. बाहेरून आत कोण आहे हे स्वच्छ दिसले पाहिजे. शाळेची बस पिवळ्या रंगाची हवी व त्यावर शाळेची बस असे लिहिलेले असावे. बस प्रदूषणमुक्त हवी.तिचा विमा उतरवलेला हवा.

- बसचा वेग ताशी ३० किलोमीटरपेक्षा जास्त नको. त्यावर वेगनियंत्रक बसवलेला हवा. 

- मोठ्या शाळेत एक डॉक्टर हवा.मुलांना अपघात अथवा आजारपण केव्हाही येऊ शकते. छोट्या शाळांना डॉक्टर परवडणार नाही. अशा परिस्थितीत  शेजारच्या डॉक्टरबरोबर अथवा रूग्णालयाबरोबर अशी सोय करून ठेवावी. 

- शाळेचे उपाहारगृह स्वच्छ हवे व तेथील पदार्थ आरोग्यदायी हवेत.ते तपासून पाहण्याची जबाबदारी एका व्यक्तीला द्यायला हवी.

- शाळेतील जिन्यांचे कठडे, भिंती, वीज यंत्रणा, गॅस, , पाणी, दिव्यांग सुरक्षितता, काचा, कचरा, मैदान, तरणतलाव अशा अनेक ठिकाणची सुरक्षितता शाळेला वारंवार तपासात रहायला हवी. कोणत्याही गोष्टीची सुरक्षितता ही वारंवार तपासात राहावी लागते. ती एकदा तपासली आणि कायमची सुरक्षितता लाभली असे होत नाही. 

- पूर्व कल्पना न देता, अचानक घंटा वाजवून सर्व मुले शिस्तीत, रांगेत वर्गाबाहेर पडून शाळेच्या अंगणात जमतात का हे वर्षातून एकदा पहायला हवे.

- शाळेबाहेर खाद्य पदार्थाची अनधिकृत दुकाने असू नयेत.

- शाळेत कोणत्याही पदावर भरती करत असताना, त्या व्यक्तीची प्रवृत्ती गुन्हेगारी स्वरूपाची नाही ना, त्याच्यावर लैंगिक आरोप काही नाहीत ना हे पूर्ण तपासायला हवेत. 

- शाळेतील नवीन बांधकाम, दुरुस्ती ( नळ, वीज) ही कामे शाळेच्या वेळेबाहेर करावीत. कामगार गुन्हेगारी प्रवृत्तीचे नाहीत ना हे पोलिसांकडून तपासून घ्यावे. 

- शिक्षक धरून प्रत्येक  कर्मचा-याची वैयक्तिक माहिती उदा.पूर्ण नाव, पत्ता, पॅन नंबर, आधार नंबर, फोन क्रमांक, शाळेच्या दप्तरी हवा. त्यांचे अॅफिडेविट व दोन साक्षीदारांची नावे शाळेच्या दप्तरी हवीत.कोणी कर्मचारी शाळा सोडून जाताना तो का सोडून जात आहे, याचे पत्र शाळेच्या दप्तरी हवे.

- एखाद्या कर्मचा-यावर गुन्हेगारी स्वरूपाचा अथवा लैंगिक स्वरूपाचा आरोप असेल तर त्याला कामावरून काढून टाकावे. 

- शाळेत महिला शिक्षक व पुरूष शिक्षक आणि मुले व मुली या चार वर्गांसाठी वेगवेगळी प्रसाधन गृहे हवीत.

- पाचवीपासूनच्या मुलांसाठी त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेबध्दल त्यांना माहिती देत राहिले पाहिजे. ती दरवर्षी एकदा दिली पाहिजे. मुलांजवळ त्यांचे नाव, पालकांचे नाव, पूर्ण पत्ता, पालकांचा फोन नंबर ही माहिती लिहिलेली असली पाहिजे. विद्यार्थ्यांना कोणी त्रास दिला तर त्याने ती माहिती पालकांना लगेच दिली पाहिजे.

- मुलाना रहदारीची शिस्त आणि नियम शिकवले पाहिजे.

- विद्यार्थ्यांना शिक्षा करताना शिक्षकांनी त्याला शारीरिक व मानसिक इजा होणार नाही, लैंगिक छळ होणार नाही, घृणा उत्पन्न होणार नाही,भावना दुखावल्या जाणार नाहीत, पालाकांबद्धलचा आदर दुखावला जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

- पोलिसांच्या मदत केंद्राचा फोन नंबर शाळेच्या दर्शनी भागात लावावा.शाळेत एक तक्रार पेटी आणि सूचना पेटी लावलेली असावी. 
 

(लेखक मराठी विज्ञानपरिषदेत कार्यवाह आहेत) 

 

Web Title: Learn about the safety of your school children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा