छत्तीसगढ :नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीनंतर १५ जवान बेपत्ता; ५ जवान झाले होते शहीद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 08:52 AM2021-04-04T08:52:22+5:302021-04-04T08:55:23+5:30

शनिवारी सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झाली होती चकमक. ३० जखमी जवानांवर उपचार सुरू

at least 15 jawans missing after sukma encounter bodies of 2 out of 5 jawans who died in encounter 30 injured | छत्तीसगढ :नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीनंतर १५ जवान बेपत्ता; ५ जवान झाले होते शहीद

छत्तीसगढ :नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीनंतर १५ जवान बेपत्ता; ५ जवान झाले होते शहीद

Next
ठळक मुद्देशनिवारी सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झाली होती चकमक.३० जखमी जवानांवर उपचार सुरू

छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त विजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमा भागात शनिवारी सुरक्षा दलातील आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीदरम्यान पाच सैनिकांना हौतात्म्य आलं होतं. दरम्यान,  आता छत्तीसगड पोलिसांच्या सूत्रांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार चकमकीनंतर कमीतकमी १५ जवान बेपत्ता असल्याचं सांगण्यात आलं. तर दुसरीकडे शहीद झालेल्या पाच जवानांपैकी २ जवानांचं पार्थिव सापडलं असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीत जखमी झालेल्या २३ जवानांना विजापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, तर ७ जवानांना रायपूर येथील रुग्णालयात पाठविण्यात आलं आहे.



केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कोब्रा बटालियन, डीआरजी आणि एसटीएफची संयुक्त टीम नक्षलविरोधी कारवाईसाठी शुक्रवारी रात्री रवाना करण्यात आली होती. विजापूर जिल्ह्यातील तर्रेम, उसूर व पामेड आणि सुकमा जिल्ह्यातील मिनापा व नरसपुरम येथील कारवाईत सुमारे दोन हजार सैनिक सहभागी झाले होते, असं राज्यातील नक्षलविरोधी कारवाईचे पोलीस उपमहानिरीक्षक ओ.पी. पाल यांनी शुक्रवारी रात्री सांगितलं होतं. दरम्यान, शनिवारी नक्षलवाद्यांसोबत झालेली चकमत तब्बल तीन तासांपेक्षा अधिक वेळ सुरू होती अशी माहितीही पोलीस अधिकाऱ्यानं दिलं. यापूर्वी २३ मार्च रोजी नक्षलवाज्यांनी नारायणपूर जिल्ह्यात स्फोट करून बस उडवली होती. यामध्ये बसमध्ये असलेले डीआरजीचे पाच जवान शहीद झाले होते. 

Web Title: at least 15 jawans missing after sukma encounter bodies of 2 out of 5 jawans who died in encounter 30 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.