दुचाकी झाडावर आदळल्याने तरुण जागीच ठार मध्यरात्री झाला अपघात : नातेवाईकांना सोडण्यासाठी जात होता स्टेशनवर

By admin | Published: April 21, 2016 11:32 PM2016-04-21T23:32:25+5:302016-04-21T23:32:25+5:30

जळगाव: नातेवाईकांना रेल्वे स्टेशनवर सोडण्यासाठी जात असताना भरधाव वेगाने जाणारी दुचाकी झाडावर आदळल्याने त्यात किशोर मोहनलाल ललवाणी (वय २६,रा.सिंधी कॉलनी) हा दुचाकीस्वार तरुण जागीच ठार तर त्याचा सहकारी मित्र सागर रमेशलाल तलरेजा (वय ३०,रा.सिंधी कॉलनी) हा जखमी झाला. हा अपघात गुरुवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ झाला.

At least two people died on the spot after being hit by two wheelers. | दुचाकी झाडावर आदळल्याने तरुण जागीच ठार मध्यरात्री झाला अपघात : नातेवाईकांना सोडण्यासाठी जात होता स्टेशनवर

दुचाकी झाडावर आदळल्याने तरुण जागीच ठार मध्यरात्री झाला अपघात : नातेवाईकांना सोडण्यासाठी जात होता स्टेशनवर

Next
गाव: नातेवाईकांना रेल्वे स्टेशनवर सोडण्यासाठी जात असताना भरधाव वेगाने जाणारी दुचाकी झाडावर आदळल्याने त्यात किशोर मोहनलाल ललवाणी (वय २६,रा.सिंधी कॉलनी) हा दुचाकीस्वार तरुण जागीच ठार तर त्याचा सहकारी मित्र सागर रमेशलाल तलरेजा (वय ३०,रा.सिंधी कॉलनी) हा जखमी झाला. हा अपघात गुरुवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ झाला.
सागर तलरेजा याच्याकडे नामकरणाचा कार्यक्रम होता. त्यासाठी आलेल्या नातेवाईकांना रेल्वे स्टेशनवर सोडण्यासाठी जात असताना गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ समोरुन अचानक वाहन आल्याने त्याला वाचविताना तोल सुटल्याने दुचाकी (क्र.एम.एच.१९ बी.यु.०१२१) ही रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली, असे सागरचा भाऊ विक्रम याने सांगितले. किशोर हा दुचाकी चालवत असल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागला, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
तत्काळ दाखल झाले पोलीस
अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक नवलनाथ तांबे हे सहकार्‍यांसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यापाठोपाठ त्यांचे मित्रही तेथे आले. त्यांनी जखमीला तातडीने जिल्हा रुग्णालयात रवाना केले. यात दोघेजण दारुच्या नशेत तर्र असल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमी सागरला नंतर खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दोन बहिणींचा एकुलता भाऊ
किशोर हा दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने शिक्षणाऐवजी तो फुले मार्केटमध्ये भारत जनरल या कापड दुकानात कामाला होता. तर त्याचे वडील मोहनलाल ललवाणी हे गावोगावी कटलरी विक्रीचे काम करतात. आई गृहिणी आहे. दोन्ही बहिणींचे लग्न झाले आहे.
शनिवारी गेला होता माहूरगडावर
किशोर हा अतिशय मनमिळावू व कष्टाळू मुलगा होता, असे तो काम करत असलेल्या दुकानाच्या शेजारील दुकानदारांनी व त्याच्या मित्रांनी सांगितले. शनिवारी तो मित्रांसह माहुरगडला गेला होता. सागर याची फुले मार्केटला पकवानची गाडी आहे. दुपारी शवविच्छेदन झाल्यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजता किशोरवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या निधनामुळे तो कामाला असलेले दुकान बंद ठेवण्यात आले होते.

Web Title: At least two people died on the spot after being hit by two wheelers.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.