समान नागरी कायद्याचा मुद्दा धर्मगुरूंवर सोडावा - मुलायम
By admin | Published: October 15, 2016 01:50 AM2016-10-15T01:50:22+5:302016-10-15T01:50:22+5:30
समान नागरी कायद्याचा मुद्दा धर्मगुरूंवर सोडायला हवा, असे समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी शुक्रवारी येथे म्हटले. या मुद्यावरून अखिल
लखनौ : समान नागरी कायद्याचा मुद्दा धर्मगुरूंवर सोडायला हवा, असे समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी शुक्रवारी येथे म्हटले. या मुद्यावरून अखिल भारतीय मुस्लिम वैयक्तिक कायदेमंडळ आणि केंद्र सरकारमध्ये कायदेशीर लढाई सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर सपा प्रमुखांनी पक्षाची ही भूमिका स्पष्ट केली.
समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या चर्चेबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुलायमसिंह म्हणाले की, या विषयावर अधिक बोलणार नाही; परंतु, याबाबत कोणताही वाद होऊ नये. समान नागरी कायद्याचा मुद्दा धर्मगुरूंवर सोडायला हवा. राष्ट्र आणि माणुसकीच्या मुद्यावर सर्वांनी एकजूट राहिले पाहिजे. समान नागरी कायद्याचा मुद्दा यापूर्वीही अनेकदा उचलला गेला, असेही ते म्हणाले.
अखिल भारतीय मुस्लिम वैयक्तिक कायदेमंडळ आणि देशातील इतर काही प्रमुख मुस्लिम संघटनांनी काल समान नागरी कायद्यावरील विधि आयोगाच्या प्रश्नावलीवर बहिष्कार टाकून केंद्रातील भाजप सरकारने आपल्या समाजाविरुद्ध युद्ध छेडल्याचा आरोप केला होता. (वृत्तसंस्था)