मंगला एक्सप्रेसला थांबा द्या

By admin | Published: January 24, 2016 10:20 PM2016-01-24T22:20:33+5:302016-01-24T22:20:33+5:30

समस्या : पाच हजार प्रवाशी

Leave Mangala Express | मंगला एक्सप्रेसला थांबा द्या

मंगला एक्सप्रेसला थांबा द्या

Next
स्या : पाच हजार प्रवाशी
जळगाव : जिल्हाभारतून शहरात नोकरी व कामानिमित्त रोज हजारावर प्रवासी रेल्वेने ये-जा करतात. मात्र सायंकाळी परतीच्या दरम्यान गाडी नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. यासाठी मंगला एक्सप्रेस गाडीला जळगाव स्थानकावर थांबा देण्याची मागणी प्रवासी संघटनांकडून होत आहे.
डाऊन मार्गावर ये जा करणार्‍या प्रवाशांना सायंकाळी ७ वाजेनंतर रात्री ९:२५ वाजेपर्यंत गाडीची वाट बघावी लागत असल्यानग प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. उशीराच्या गाडीने जाऊन पुढील गावांच्याप्रवासाठी (खेडगावांसाठी) वाहने उपलब्ध नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असते. यामूळे सायंकाळी ७ ते ९:३०वाजे दरम्यान गाडीची आवश्यकता आहे.
मंगला एक्सप्रेस
सायंकाळी ६:३० ते ७ वाजे दरम्यान जळगाव स्थानकावरुन डाऊन मार्गावर पवन एक्सप्रेस, सुरत -भुसावळ पॅसेंजर व कायामाणी एक्सप्रेस अशा तीन रेल्वे गाड्या आहेत. यातून अनेक प्रवाशी ये जा करतात. मात्र काही नोकरदारांच्या कार्यालयाची वेळ उशीरापर्यंत असल्याने त्यांना या गाड्यांचा फायदा होत नसल्याने त्यांना रात्रीच्या हुतात्मा एक्सप्रेस व सेवाग्राम एक्सप्रेसची वाट पहावी लागते. यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी मंगला एक्सप्रेस या गाडीला थांबा मिळण्याची मागणी आहे.
कोकणासाठी कमी गाड्या
शिवाय भुसावळ विभागातूून कोकण व गोवाकडे जाणार्‍या गाड्यांची संख्या कमी आहे. या गाडीला येथे थांबा नसल्याने प्रवाशांना भुसावळ स्थानकावरुन ही गाडी पकडावी लागते परती दरम्यान ही तीच परिस्थिती असल्याने गाडीला थांबा मिळण्याची मागणी अनेक वर्षांपासून खान्देश रेल्वे प्रवासी मंचतर्फे मध्य रेल्वेचे जी. एम. सुनीलकुमार सूद यांच्याकडे करण्यात आली आहे.
पाच हजार प्रवाशी
जिल्हाभारातून शहरात रोज ये-जा करणार्‍या प्रवाशांची संख्या पाच हजारावर आहे. तर जळगावच्या पास धारकांची संख्या शंभरावर आहे. यामूळे सायंकाळी रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी होतांना दिसते. त्यात वेळेवर गाडी नसल्याने प्रवाशंमधून नाराजी उमटत असते.
वेळ व पैशांचा खर्च
आवश्यक वेळेवर गाडी उपलब्ध नसल्याने व संबंधीत स्थानकांवरुन खेडेगावांकडे जाण्यासाठी वाहने उपलब्ध नसल्याने होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांना इतर वाहनांच्या मदतीनआपला मार्ग निवडावा लागतो यामूळे पैसा व वेळ वाया जातो.

कोट
मंगला एक्सप्रेस संबंधात प्रवासी संघटनांतर्फे स्थानिक स्थरावर मागणी आलेली नाही. वरिष्ठस्तरावर करण्यात आलेल्या मागणीची माहिती आपल्याकडे नाही.
- ए. एस. कुलकर्णी
स्थानक व्यवस्थापक,जळगाव.

Web Title: Leave Mangala Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.