कब्जा केलेला प्रांत सोडा : भारताने पाकला सुनावले
By Admin | Published: June 4, 2016 02:34 AM2016-06-04T02:34:24+5:302016-06-04T02:34:24+5:30
जम्मू आणि काश्मीरमधील बेकायदेशीररीत्या कब्जा केलेला भूभाग तत्काळ रिकामा करा आणि या मुद्याला विनाकारण आंतरराष्ट्रीय स्वरूप देऊ नका
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील बेकायदेशीररीत्या कब्जा केलेला भूभाग तत्काळ
रिकामा करा आणि या मुद्याला विनाकारण आंतरराष्ट्रीय स्वरूप देऊ नका, अशा स्पष्ट शब्दांत भारताने पाकिस्तानला व्याप्त भाग सोडण्यास सांगितले आहे.
‘पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या ज्या भागांवर बेकायदेशीररीत्या कब्जा केलेला आहे, तो भाग पाकिस्तानने आता रिकामा करण्याची गरज आहे,’ असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी म्हटले आहे.
काश्मीर मुद्यावर पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका संमेलनाच्या संदर्भात मत व्यक्त करताना स्वरूप बोलत होते. ‘संपूर्ण जम्मू-काश्मीरवर भारताचे सार्वभौमत्व आहे आणि हितसंबंधीयांचे भारताविरुद्धचे सर्व आक्षेप आम्ही फेटाळले आहेत. तसेच काश्मीर मुद्याला जागतिक आयाम मुळीच नाही यावर आम्ही भर दिलेला आहे.
परंतु या द्विपक्षीय मुद्याला आंतरराष्ट्रीय मुद्दा बनविणे हे ज्यांच्या मनात आहे, तेच लोक त्याला जागतिक आयाम देण्याचा प्रयत्न करीत आहेत,’ असे स्वरूप
म्हणाले. (वृत्तसंस्था)