दुचाकी सोडून चोरटा पळाला

By admin | Published: October 30, 2016 10:46 PM2016-10-30T22:46:35+5:302016-10-30T22:46:35+5:30

जळगाव: मोहाडी शिवारात रायसोनी महाविद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या धनलक्ष्मी रिअल इस्टेट टॉवरमध्ये चोरी करतांना पकडला जाण्याच्या भीतीने चोरट्याने सोबत आणलेली दुचाकी सोडून पळ काढल्याची घटना शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली. चोरट्याची दुचाकी जप्त करण्यात आली असून त्याच्याविरुध्द चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leaving a bicycle, the sneaky ran away | दुचाकी सोडून चोरटा पळाला

दुचाकी सोडून चोरटा पळाला

Next
गाव: मोहाडी शिवारात रायसोनी महाविद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या धनलक्ष्मी रिअल इस्टेट टॉवरमध्ये चोरी करतांना पकडला जाण्याच्या भीतीने चोरट्याने सोबत आणलेली दुचाकी सोडून पळ काढल्याची घटना शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली. चोरट्याची दुचाकी जप्त करण्यात आली असून त्याच्याविरुध्द चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहाडी शिवारात धनलक्ष्मी रिअल इस्टेटचे मोबाईल टॉवर आहे. येथे सुपरवायझर असलेले रवींद्र अरविंद पाटील (रा.हायवे दर्शन कॉलनी, जळगाव) यांना कंपनीचा कॉल आल्याने ते सहकार्‍यांसह रात्री टॉवरजवळ गेले असता तेथे २५ ते ३० वयोगटातील एक तरुण जनरेटरचा पत्रा कापून त्यातील बॅटरी व अन्य मशिनरी चोरुन नेण्याच्या तयारीत होता. कोणीतरी आल्याची चाहूल लागताच चोरट्याने त्याच्या जवळील दुचाकी (क्र.एम.एच.१९ बी.ई.५६७३) सोडून तेथून पळून गेला. पाटील यांनी या घटनेची माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनला कळवली. दरम्यान, चोरट्याची दुचाकी व चोरीसाठी आणलेले एक्साब्लेड, लोखंडी टॅमी, ५ गोटी पान्हे, १ एलंकी पान्हा, २ प˜ी पान्हे व फ्रेम आदी वस्तू एमआयडीसी पोलीस स्टेशनला जप्त करण्यात आल्या आहेत. दुचाकी कोळी नावाच्या व्यक्तीची असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे, मात्र अधिकृत मालक आरटीओ कार्यालयाच्या कागदपत्रावरुन स्पष्ट होईल. परंतु, या चोरीत त्याचा सहभाग आहे किंवा नाही हे तपासातून पुढे येईल. याप्रकरणी रविवारी दुपारी चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास बाळकृष्ण पाटील करीत आहेत.

Web Title: Leaving a bicycle, the sneaky ran away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.