अरे व्वा! परदेशातील लाखोंची नोकरी सोडली अन् देशात येऊन UPSC ची तयारी केली, झाला IAS
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 01:02 PM2023-03-13T13:02:34+5:302023-03-13T13:03:27+5:30
कनिष्क कटारिया यांनी परदेशातील लाखोंची नोकरी सोडून देशात येऊन UPSC ची तयारी केली आहे.
प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. कनिष्क कटारिया यांनी परदेशातील लाखोंची नोकरी सोडून देशात येऊन UPSC ची तयारी केली आहे. आयएएस अधिकारी कनिष्क कटारिया, जे आयआयटी-बॉम्बेचे माजी विद्यार्थी होते. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याचा आणि आयएएस अधिकारी बनण्याचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे.
IAS कनिष्क कटारिया यांनी UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी आणि उत्तीर्ण होण्यावर इतके लक्ष केंद्रित केले की, त्यांनी आपली चांगल्या पगाराची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. 2019 मधील परीक्षेत तो ऑल इंडिया रँक पहिला आले. IAS अधिकारी बनले. IAS कनिष्क कटारिया हे राजस्थानमधील कोटा येथील रहिवासी आहेत. त्यांनी कोटा येथील सेंट पॉल सीनियर सेकेंडरी स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले.
कनिष्क अभ्यासात नेहमीच चांगले होते आणि म्हणूनच त्याने आयआयटी जेईई 2010 मध्ये 44 वा क्रमांक मिळवला. कनिष्क कटारिया यांनी दक्षिण कोरियातील प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सॅमसंगमध्ये डेटा सायंटिस्ट म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. काही वर्षांनी ते भारतात परतले आणि बंगळुरूमधील एका अमेरिकन स्टार्टअप कंपनीत रुजू झाले. कनिष्क कटारिया या नोकरीतून खूप चांगला पगार मिळवत होते, पण त्यांनी ही नोकरी सोडून यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला.
कनिष्कने काही महिने दिल्लीतील एका कोचिंग सेंटरमध्ये यूपीएससीचा अभ्यास केला. यानंतर ते सेल्फ स्टडीसाठी कोटा येथे गेले. अखेरीस 2019 मध्ये त्याने ऑल इंडिया रँक 1 मिळवला आणि UPSC टॉपर झाले आणि IAS अधिकारी बनले तेव्हा त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"