दलितवस्ती निधी योजनेअंतर्गत एलईडी लाइट जोडणी

By admin | Published: June 28, 2016 05:16 PM2016-06-28T17:16:31+5:302016-06-28T17:16:31+5:30

पातूर : पातूर न. प. दलितवस्ती निधी योजनेअंतर्गत दलितवस्ती प्रभाग क्र. ३ मध्ये २५ जून रोजी एलईडी लाइट जोडणीचे उद्घाटन प्रभाग क्र. ३ च्या नगरसेविका वंदनाताई साहेबराव सुरवाडे व समाजसेवक मजहरउल्ला यांचे हस्ते पार पडले. पातूर न. प. ने दलितवस्तीच्या उद्देशाने एलइडी लाइटची जोडणी करण्यात आली आहे.

LED light connectivity under Dalitwati fund scheme | दलितवस्ती निधी योजनेअंतर्गत एलईडी लाइट जोडणी

दलितवस्ती निधी योजनेअंतर्गत एलईडी लाइट जोडणी

Next
तूर : पातूर न. प. दलितवस्ती निधी योजनेअंतर्गत दलितवस्ती प्रभाग क्र. ३ मध्ये २५ जून रोजी एलईडी लाइट जोडणीचे उद्घाटन प्रभाग क्र. ३ च्या नगरसेविका वंदनाताई साहेबराव सुरवाडे व समाजसेवक मजहरउल्ला यांचे हस्ते पार पडले. पातूर न. प. ने दलितवस्तीच्या उद्देशाने एलइडी लाइटची जोडणी करण्यात आली आहे.
यामध्ये प्रभाग क्र. ३ मधील भीमनगर, पंचशील नगर, जमदार प्लॉट, सैयद पुरा, खाटीक पुरा तसेच सर्व दलितवस्तीचा समावेश आहे. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते साहेबराव सुरवाउे, विष्णू शेलारकर, अण्णाभाऊ पोहरे, हरिभाऊ सुरवाडे, न. प. कर्मचारी बंडू पाटील, दीपक सुरवाडे, निखिल उपर्वट, प्रवीण बोरकर, सै. मुशर्रफ, सै. इरफान, हनिक पटेल, विष्णू सुरवाडे, मंगेश डोंगरे, प्रफुल्ल सरदार, गजानन गुजर, योगेश डोंगरे, पवन सुरवाडे, सुरज धाडसे, प्रवीण घाटे तसेच नगरातील तमात नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: LED light connectivity under Dalitwati fund scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.