Leena Manimekalai: कालीमातेच्या आक्षेपार्ह पोस्टरनंतर आता लीनाने शेअर केले शिव-पार्वतीचे प्रक्षोभक फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 10:30 AM2022-07-07T10:30:34+5:302022-07-07T10:30:59+5:30
Leena Manimekalai: काली चित्रपटातील पोस्टरवरून वाद वाढलेला असतानाच दिग्दर्शक लीना मणिमेककलई हिने अजून एक ट्विट केले आहे. या फोटोमध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची भूमिका वठवत असलेले अभिनेते सिगारेट पित असताना तिने दाखवले आहे.
नवी दिल्ली - काली चित्रपटातील पोस्टरवरून वाद वाढलेला असतानाच दिग्दर्शक लीना मणिमेककलई हिने अजून एक ट्विट केले आहे. त्यावरून आता तिच्यावर पुन्हा टीका सुरू झाली आहे. या फोटोमध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची भूमिका वठवत असलेले अभिनेते सिगारेट पित असताना तिने दाखवले आहे.
हा फोटो ट्विट करताना लीना मणिमेकलई हिने लिहिले की, कुठेतरी दुसरीकडे... त्यावरून आता ट्विटर युझर्स तिला टीकेचे लक्ष्य करत आहेत. एका युझरने लिहिले आहे की, ती केवळ द्वेष पसरवत आहे. तर दुसऱ्याने लिहिले की, धर्माचा अपमान करणे बंद झालं पाहिजे.
लीना मणिमेकलईकडून ट्वीट करण्यात आलेल्या फोटोंवर आता राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजपा नेते शाहजाद पूनावाला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, हा रचनात्मक अभिव्यक्तीचा विषय नाही आहे. तर हा जाणूनबुजून भावना भडकवण्याचा प्रकार आहे.
हिंदूंना शिव्या देणे = धर्मनिरपेक्षता?
हिंदूंच्या श्रद्धेचा अपमान करणे = उदारमतवाद?
शाहजाद पूनावाला यांनी पुढे लिहिले की, डावे पक्ष, काँग्रेस, टीएमसीकडून पाठिंबा मिळत असल्याने लीना मणिमेकलई हिचे साहस वाढले आहे. टीएमसीने महुआ मोईत्रावर कारवाई केलेली नाही.
Elsewhere…. pic.twitter.com/NGYFETMehj
— Leena Manimekalai (@LeenaManimekali) July 7, 2022
हल्लीच लीना मणिमेकलईचा डॉक्युमेंट्री चित्रपट कालीच्या आक्षेपार्ह पोस्टरमुळे मोठा वाद निर्माण झाला होत. लीना मणिमेकलईच्या या चित्रपटातील पोस्टरमध्ये काली मातेला सिगारेट पिताना आणि एका हातात एलजीबीटीक्यूचा झेंडा दिसत होता. हा पोस्टर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावरून त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.